भाकरी किंवा चपातीसोबत गरमागरम भरलेली मसाला वांगी (Masala Vangi) खायला कुणाला का आवडणार नाही. खरंतर, विविध ठिकाणी वेगवेगळा मसाला वापरून भरलेली मसाला वांगी केली जातात. त्यामुळे त्याची चवदेखील न्यारी असते. आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर तिथे मिळणाऱ्या मसाली वांगींची चव वेगळीच असते. हॉटेल स्टाईल भरलेली मसाली वांगी कशी बनवायची जाणून घेऊया. (Masala Vangi)
त्याआधी वांगे खाण्याचे फायदे जाणून घेऊया. वांग्यामध्ये फायबर्स असतात, त्यामुळे पोट भरल्याची जाणीव होते. वजन कमी करण्यासाठी वांगे फायदेशीर आहे. कॅलरीज कमी करण्यासाठी वांगी उपयुक्त आहेत. वांग्यामध्ये आयर्न, मॅग्नेशियम, कॅल्शियम असतात. हाडे मजबूत होण्यासाठी वांगी आरोग्यदायी ठरतात. पण, किडनीस्टोन असणाऱ्यांसाठी वांगी न खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
[saswp_tiny_recipe recipe_by="स्वालिया शिकलगार" course="लंच" cusine="महाराष्ट्रीयन" difficulty="सोपे" servings="४" prepration_time="२०" cooking_time="२०-२५" calories="" image="" ingradient_name-0="कांदा" ingradient_name-1="लसुण" ingradient_name-2="कच्चे शेंगदाणे" ingradient_name-3="वांगे" ingradient_name-4="पाणी" ingradient_name-5="कडीपत्ता" ingradient_name-6="लाल तिखट" ingradient_name-7="मीठ" ingradient_name-8="हळद" ingradient_name-9="गरम मसाला" ingradient_name-10="तेल" ingradient_name-11="वाळलेल्या खोबऱ्याचा खिस" ingradient_name-12="जिरा" ingradient_name-13="कोथिंबीर" direction_name-0="कोवळी वांगी स्वच्छ धुवून घ्या" direction_name-1="वांगी उभी कापून चार भाग करून घ्यावे" direction_name-2="कढई गॅसवर गरम करून एक चमचा तेल टाकून वांगी भाजून घ्यावी" direction_name-3="वांग्यांना ब्राऊन रंग आला की, बाजूला काढून घ्यावे" direction_name-4="तेलात चिरलेला कांदा, कच्चे शेंगदाणे, लसुण, खोबऱ्याचा खिस चांगले भाजून घ्यावे" direction_name-5="हे मिश्रण थंड झाले की, ते खलबत्ता अथवा मिक्सरमध्ये वाटून घ्यावे" direction_name-6="मिश्रण थोडे जाडसर वाटून घ्या" direction_name-7="एक एक वांगे घेऊन हा मसाला त्यामध्ये भरून घ्या" direction_name-8="उरलेला मसाला ठेवून द्या, तो वांगी शिजवताना लागेल" direction_name-9="आता दुसऱ्या कढईमध्ये प्रमाणानुसार तेल गरम कारायला ठेवा" direction_name-10="गॅस मंद आचेवर ठेवून एक चमचा जिरे टाका" direction_name-11="५-६ कडीपत्त्याची पाने टाका" direction_name-12="मसाला भरलेली वांगी एक एक करून तेलात सोडून द्या" direction_name-13="मसाला दोन्ही बाजूला चांगले भाजून घ्या" direction_name-14="त्यामध्ये हळद, मीठ, गरम मसाला, लाल तिखट घाला" direction_name-15="वरून उरलेला मसाला टाकून हलक्या हाताने वांगी परतून घ्या" direction_name-16="आता एक वाटी पाणी टाकून कढईवर झाकण ठेवून वांगी शिजवून घ्या" direction_name-17="पाच मिनिटांनी वरून चिरलेली कोथिंबीर घाला" direction_name-18="गरमागरम मसाले वांगी तयार आहे" notes_name-0="वांगी पूर्ण न कापता अर्ध्याहून जास्त उभे चिरून घ्यावे, जेणेकरून त्याचे सुटे भाग होणार नाहीत" html="true"]