पुढारी ऑनलाईन डेस्क : मुलांच्या शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या आहेत. यामुळे स्वयंपाक घरातील लहान मुलांची लुडबूड वाढली आहे. दरम्यान सकाळी उठल्यावर मुलांना चहा किंवा दुध पिण्याचा सवय असते. चहा तर सर्वांच्याच आवडीचे पेय आहे. प्रत्येकाच्या दिवासाची सुरूवात चहाने होत असते. चहासोबत ब्रेड, पाव, खारी, बिस्किट किंवा ब्रेकस्फाट म्हणून कांदे पोहे, इडली, उपमा, शिरा यासारखे पदार्थ बनविले जातात. परंतु, हे पदार्थ खावून कंटाळा आलाय. तर मग बनवा खमंग आणि खुसखुशीत तिखट मसाला पापडी. जाणून घेवूयात रेसीपी… ( Masala Papdi )
गव्हाचे पीठ – दोन वाटी
रवा- अर्धा वाटी
लाल तिखट- १ चमचा
गरम मसाला- १ चमचा
ओवा- १ चमचा
कसूरी मेंथी- २ चमचा
मीठ- चवीनुसार
तेल- तळण्यासाठी
पाणी- आवश्यकतेनुसार
१. पहिल्यांदा दोन वाटी गव्हाचे पीठ किंवा मैदा घेवून ते चाळणीने चाळून घ्यावे.
२. यानंतर यात अर्धा वाटी रवा, लाल तिखट, गरम मसाला, ओवा, कसूरी मेंथी आणि चवीपुरते मीठ घालावे. आणि हे मिश्रण एकत्रित करावे.
३. यात एका चमचा थंड तेल घालून सर्वत्र मिक्स करावे.
४. यानंतर या पीठात थोडे- थोडे पाणी घालून चांगले मळावे आणि गोळा तयार करावा.
५. पीठाचा गोळा एक तास भिजत ठेवावे.
६. एक तासानंतर पुन्हा एकादा तेलाचा हात फिरवून चांगले पीठ मळून घ्यावे.
७. मळलेल्या कणकेचे गोळे करून पोळपाटावर लाटावे आणि काटे चमचाच्या सहाय्याने सर्वत्र एकसारखे छोटे- छोटे छिद्र पाडावे. (चपातीसारखे पातळ लाटावे)
८. नंतर एका वाटीच्या सहाय्याने पुरीच्या आकाराच्या गोल पापडी तयार करावी.
९. सगळ्या पिठाच्या पापड्या तयार झाल्यानंतर एका कढाईत तेल गरम करून त्यात तळून घ्यावे.
१०. खुसखुशीत आणि खमंग तिखट मसाला पापडी तयार झालेली चहासोबत खायला घावी. ( Masala Papdi )
हेही वाचा :