Bread Chivda : शिल्लक राहिलेल्या ब्रेडपासून १० मिनिटांत बनवा खमंग ब्रेड चिवडा

Bread Chivda
Bread Chivda

पुढारी ऑनलाईन डेस्क : दररोज सकाळी उठल्यानंतर महिला वर्गाला नाष्टाला काय बनवायचे हा प्रश्न पडलेला असतो. काही वेळा मोठ्यांना काय आवडते? किंवा घरात लहान मुले असतील तर त्यांना काय आवडते? हे पाहून पदार्थ बनवण्याचा प्रयत्न केला जातो. कांदे पोहे, शिरा, उपमा, इडली, वेगवेगळ्या प्रकारची बिस्किटे, खारी, अंडी चहासोबत नाष्टा म्हणून दिले जाते. दरम्यान घरात ताजा आणलेला ब्रेड मात्र दोन – तीन दिवसांनी न खाल्यास शिळा होवून जातो. काही वेळा मुलांना तसाच ब्रेड खायला दिला तर तो मुले खात नाहीत. म्हणून शिल्लक राहिलेल्या शिळ्या ब्रेडपासून १० मिनिटांत नाष्टाला खमंग ब्रेड चिवडा बनवा. पहा तो कशा बनवायचा… ( Bread Chivda )

साहित्य-

शिल्लक राहिलेला शिळा ब्रेड- ५ ते ६
मोहरी – अर्धा चमचा
जिरे- अर्धा चमचा
लसूण- ५-६ पाकळ्या
हिरवी मिरची- ४ ते ५
शेंगदाणे- अर्धा कप
बारीक चिरलेला कांदा- १ कप
बारीक चिरलेला टोमॉटो- १
दही- २ चमचा
कडीपत्ता- ५-६ पाने
बारीक चिरलेली कोंथबीर- अर्धा कप
हळद- अर्धा चमचा
लाल तिखट- अर्धा चमचा
मीठ- चवीपुरते
तेल- २ चमचा

कृती-

१. पहिल्यांदा एका कढाईत तेल टाकून त्यात शेंगदाणे घालून भाजून घ्यावेत. भाजल्यानंतर शेंगदाणे तेलातून एका प्लेटमध्ये काढून घ्यावे.

२. यानंतर तापलेल्या त्याच तेलात जिरे आणि मोहरी घालावी.

३. जिरे आणि मोहरी तडतडल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून चांगले परतून घ्यावे.

४. यानंतर यात हिरवी मिरची, कडीपत्त्याची पाने, बारिक चिरलेली टोमॉटो परतून घ्यावा.

५. मिश्रणात अर्धा चमचा हळद, लाल तिखट, बारीक चिरलेली कोंथबीर आणि चवीपुरते मीठ घालून हलवावे.

६. हे मिश्रण एकजीव झाल्यानंतर यात बारिक केलेले ब्रेडचे तुकडे घालून चांगले परतावे.

७. हे मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्यात तळलेले शेंगदाणे आणि दही किंवा लिंबूचा रस घालून एकजीव करावे.

८. हे मिश्रण १० मिनिटापर्यत मंद गॅसवर चांगले वाफवून घ्यावे.

९. शेवटी तयार झालेला खमंग ब्रेड चिवडा नाष्टाला सर्वांना खायला द्यावा. ( Bread Chivda )

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news