chicken fry : स्वादिष्ट आंध्रा स्टाईल चिकन फ्राय कशी कराल?

 Andhra Recipe Chicken Fry
Andhra Recipe Chicken Fry

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्याकडे चिकन-६५ हा प्रकार सर्व रुढ आहे. पण, आंध्रा स्टाईलने चिकन फ्रायची (chicken fry) रेसिपी कधी खाल्ली आहे का? मासांहारप्रेमींनी तर ही रेसिपी जरूर ट्राय करावी. कारण, आंध्रा स्टाईलची रेसिपी युनिक आहे. त्याची चव जिभेवर रेंगाळते.अशी रेसिपी कशी करतात ते पाहुया…

साहित्य 

१) अर्धा किलो चिकन, ७-८ पानं कढीपत्ता

२) एक इंच दालचिनी आणि एक चमचा लिंबाचा रस

३) अर्धा चमचा काळी मिरची पावरड आणि एक चमचा तूप

४) चिमूटभर बडिशेप आणि ३-४ हिरव्या मिरच्या

५) दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेला कांदा

६) दहा काजू, पाच लवंगाच्या कुडी

७) चिमूटभर हळद, १ चमचा आलं-लसूण पेस्ट

८) एक चमचा लाल मिरची पावडर, दोन कप दही, कोथिंबीर

कृती 

१) सर्वांत पहिल्यांदा एक भांडं घेऊन त्यात लाल मिरची पावडर, आलं-लसूण पेस्ट, हळद आणि दही घेऊन त्यात चिकन मिक्स करून तासभर मुरण्यासाठी बाजुला ठेवून द्या. (chicken fry)

२) आता एका बाऊलमध्ये कांदा कापून घ्या. त्यानंतर एका बाऊलमध्ये कोथिंबीर कापून घ्या आणि लिबांचा रस पिळून घ्या. नंतर काजूची पावडर करून घ्या.

३) या नंतर गॅसवर कढई ठेवून त्यात तूप गरम करून घ्या. नंतर बारीक चिरलेला कांदा भाजून घ्या. नंतर त्यात मुरलेलं चिकन घाला आणि चिकन नरम होईपर्यंत भाजून घ्या.

४) दरम्यान गॅसवर दुसरीकडे एका पॅनवर तेल गरम करून त्यात हिरवी मिरची आणि कढीपत्ताची फोडणी घाला.

५) नंतर तिच फोडणी चिकनमध्ये घाला. काजूची पावडर आणि चवीनुसार काळी मिरची पावडर व मीठ घालून घ्या.

६) त्यानंतर चिकन काही वेळापर्यंत फ्राय करून घ्या. किमान ५ मिनिटं फ्राय करत रहा. शेवटी त्यात कोथिंबीर आणि लिंबूचा रस घाला.

७) अशाप्रकारे आंध्रा स्टाईलची फ्राय चिकन रोटीसोबत खाऊ शकता किंवा गरमागरम भातासोबतही खाऊ शकता.

पाहा व्हिडिओ  : आठ दिवस टिकणाऱ्या मटण लोणच्याची रेसिपी

या रेसिपी वाचल्या का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news