Besan Kanda Paat Bhaji : कांदा पात भाजी खाऊन कंटाळा आलाय? अशी बनवा खमंग बेसन कांद्याची पात

खमंग बेसन कांद्याची पात
खमंग बेसन कांद्याची पात

गरम गरम भाकरी आणि कांदा पातीची भाजी खायला कुणाला आवडणार नाही? (Besan Kanda Paat Bhaji ) जर याचा कांदा पातीपासून वेगळा पदार्थ तुम्हाला चाखायला आवडला तर! कांदा पातीचा एक हटके पदार्थाची रेसिपी आम्ही येथे देणार आहोत. कांद्याच्या पातीमध्ये जास्त प्रमाणात फायबर असते. जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. कांदा पातीची भाजी केसांसाठी उपयुक्त आहे. केस गळणे, केस पांढरे होणे, अशा समस्यांवर गुणकारी आहे. (Besan Kanda Paat Bhaji )

कांद्याच्या पातीमध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम असते. काही जण काद्यांची पात कच्चीही खातात. रक्तातील साखर नियंत्रित करण्यास कांदा पात फायदेशीर आहे. कांद्याच्या पातीमध्ये पोषक तत्वे असल्याने आरोग्यासाठी ही भाजी उत्तम आहे.

[saswp_tiny_recipe recipe_by="स्वालिया शिकलगार" course="लंच" cusine="भारतीय" difficulty="सोपे" servings="५" prepration_time="१०" cooking_time="२०" calories="" image="" ingradient_name-0="बेसन पीठ" ingradient_name-1="हिरव्या कांद्याची पात" ingradient_name-2="तेल" ingradient_name-3="मोहरी" ingradient_name-4="तिखट" ingradient_name-5="हळद" ingradient_name-6="मीठ" ingradient_name-7="पाणी" ingradient_name-8="तुरीची अथवा हरभरा डाळ" ingradient_name-9="आले-लसुण पेस्ट" ingradient_name-10="बारीक चिरलेला कांदा" direction_name-0="तुरीचा अथवा हरभरा डाळ अर्धा तास पाण्यात भिजायला ठेवा" direction_name-1="हिरवी कांदा पात स्वच्छ धुऊन कापून घ्या" direction_name-2="गॅसवर कढई तापायला ठेवा" direction_name-3="त्यामध्ये प्रमाणानुसार तेल घाला" direction_name-4="तेल तापले की मोहरी टाका" direction_name-5="वरून बारीक चिरलेला कांदा टाका" direction_name-6="कांदा लाल होत आल्यानंतर वरून हिरवी कांदा पात टाका" direction_name-7="त्यामध्ये चवीनुसार मीठ, हळद, तिखट मसाला टाका" direction_name-8="वरून आले-लसुण पेस्ट टाका" direction_name-9="भिजवलेली डाळ देखील टाका" direction_name-10="आता भाजी हलवून घ्या" direction_name-11="वरून थोडे थोडे बेसन पीठ घालून हलवून घ्या" direction_name-12="भाजीमध्ये बेसन चांगले मिक्स होईपर्यंत भाजी परतत राहा" direction_name-13="गॅस मंद आचेवर ठेवून झाकण ठेवून ५ ते ७ मिनिटांसाठी शिजायला ठेवा" direction_name-14="चविष्ट बेसन कांदा पात भाकरी किंवा चपातीसोबत खाऊ शकता" notes_name-0="" html="true"]

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news