किचन : ड्राय फ्रुटस् सुरक्षित कसे ठेवायचे? 

किचन : ड्राय फ्रुटस् सुरक्षित कसे ठेवायचे? 

Published on

घरात ड्रायफुटस् येतात आणि एकाच वेळी सर्व संपतात असं होत नाही. मग त्यांना फ्रिजमध्ये ठेवावं का, असा विचार डोक्यात येतो. पण आत ठेवल्यावर ते ओले होतील का, खराब होतील का… अशा शंका तो विचार धुळीस मिळवतात. मग काय करावं?… त्यासाठीच या काही टिप्स…

नावातच ड्रायफ्रुटस् आहे, मग त्यांना फ्रिजमध्ये कसं ठेवायचं असा एक साधा प्रश्न आपल्या डोक्यात येतो आणि तिथंच काम फसतं. सर्वप्रथम तो विचार डोक्यातून काढून टाका. ड्राय फ्रुटस् बिनधास्त फ्रिजमध्ये ठेवा. फक्त त्यासाठी काही काळजी मात्र घ्यावी लागेल.

  •  ड्रायफ्रुटस् घरात एकाच वेळी संपतात असं होत नाही. त्यामुळे त्यांना फ्रिजमध्येच ठेवण्याचा विचार योग्य आहेे. आत ठेवल्यावर ते ओले होतील का, खराब होतील का… अशा शंका काही टीप्स वापरल्या तर नक्कीच येणार नाहीत. त्यामुळे ड्रायफ्रुटची काळजी हा महत्त्वाचा आणि गरजेचा भाग आहे, हे आधी मनाला पटवा.
  •  सर्वप्रथम ड्रायफ्रुटस्च्या आकारमानाप्रमाणे प्लास्टिकच्या काही पिशव्या आणा. जेणेकरून फ्रिजमधल्या पाण्याचा त्यावर थेट परिणाम होणार नाही. एका बॅगेत एकाच प्रकारचे ड्रायफ्रुट ठेवा. बर्‍याच जणांना पिशव्या वाचवण्याच्या नादात सगळंच एकत्र ठेवण्याची सवय असते.
  •  जे तुम्हाला अधिक आवडतं आणि जे तुम्ही कधीही खाऊ शकता, असंच ड्रायफ्रुटस् खरेदी करा. जे एकदा खाल्ल्यावर पुन्हा खावंसं वाटणार नाही, ते साठवूनही ठेवू नका.
  •  बॅगेत ड्रायफ्रुट भरल्यानंतरही जागा राहत असेल, तर बॅग फोल्ड करा. ती करताना त्यातली हवा काढून टाका व व्यवस्थित सील करा. त्यामुळे त्यातील ड्रायफ्रुट खूप दिवस टिकू शकतील.
  •  ही छोटी गोष्ट असली, तरी महत्त्वाची आहे. बॅग फ्रिजमध्ये ठेवण्यापूर्वी त्यावर मार्करने त्या ड्रायफ्रुटचं नाव आणि त्यावर तुम्ही ठेवत असल्याची तारीख नक्की टाका. कारण फ्रिजमध्ये ठेवून खूप दिवस झाले व ते तुम्ही खाल्लंच नाही, तर जेव्हा ते खाण्यासाठी काढाल, तेव्हा ते त्याच्या काळानुसार खायचं की नाही हे तुम्हाला ठरवता येईल.
  •  या सर्व गोष्टी केल्यावर आता ते फ्रिजच्या कंटेनरमध्ये ठेवा. पण एक लक्षात ठेवा की त्यात कोणतीही धूळ, झुरळे, इतर कचरा, भाजीपाला जाऊ नये. अशा पद्धतीने ठेवलेले ड्रायफ्रुटस् तब्बल वर्षभरही टिकू शकतात. त्यांचा तुम्ही कधीही आनंद घेऊ शकता. त्यात तुमचे पैसेही वाचतात.
  •  ड्रायफ्रुट घेतानाही काही काळजी नक्की घ्या. जे तुमच्या आरोग्याला पचेल, रुचेल असेच पदार्थ खरेदी करा. एखादी वस्तू पहिल्यांदाच घेणार असाल, तर त्याची टेस्ट आणि त्याचा तुमच्या आरोग्यावर होणारा परिणाम याची चाचणी घ्या. त्यासाठी प्रथम ते थोड्याच प्रमाणात खरेदी करा. म्हणजे नाही आवडले, नाही पचले, तर साठवण्याचा आणि फेकून देण्याचाही प्रश्न येणार नाही.
  •  ड्रायफ्रुटस् फ्रिजमध्ये ठेवताना सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजे ते चटकन आपल्याला काढता येणं. बर्‍याचदा फ्रिजमध्ये ते अशा पद्धतीने ठेवलं जातं की आपल्याला ते काढताच येत नाही. किंवा ते काढण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन आपण ते खाण्याचाच कंटाळा करतो. बर्‍याचदा ड्रायफ्रुटस् अनेक महिने पडून राहतात, ते याचमुळे.
  •  सो, आपल्या आरोग्यासाठी आपणच काळजी घेऊ या. ड्रायफ्रुटस् खाऊ या, तंदुरुस्त होऊ या.

     – मानसी जोशी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news