![कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करणं कसं टाळाल ? वाचा तज्ञ काय म्हणतात](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F01%2Foverthinking.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : कोणतीही कृती करताना विचारपूर्वक करावी असा सल्ला आपल्याला नेहमी दिला जातो. कारण विचार करण हा मानवी मनाचा स्थायीभाव आहे. आपण सगळेच विचार करणं या प्रक्रियेतून जात असतो. पण विचार करण्याचं अतिविचार करण्याकडे रूपांतर होत नाही हे पाहणं गरजेचं ठरतं. अतिविचार करण्याची सवय अनेकदा आपल्याही नकळत लागते. या सवयीमुळे फायदा होण्याऐवजी नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. अतिविचार करण्याची सवय असलेल्या व्यक्ती अनेकदा कोणत्याही निर्णयाबाबत गोंधललेल्या दिसतात. त्यामुळे सहज सोपे वाटणारे निर्णय घेणंही त्यांच्यासाठी टास्क होऊन बसतो.
अनेकदा अतिविचार करणारी माणसं भविष्यातील काही घटना, शक्यता किंवा परिणाम यांच्याविषयी कल्पनेतच नकारात्मक विचार करतात. परिणामी त्या कृतीमधील त्यांचा आत्मविश्वास हरविण्याची शक्यता जास्त असते. मानसिक आरोगयाबाबत बोलताना केवळ विशिष्ट मानसिक आजारांबाबत बोललं जातं. पण अतिविचार किंवा overthinking हे देखील मानसिक आरोग्याच्या संदर्भात लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. सतत येणाऱ्या या विचारांना दरवेळी कोणती दिशा असतेच असं नाही. त्यामुळे अनेकदा महत्त्वाच्या आणि मूळ मुद्यांकडे दुर्लक्ष होणं किंवा त्याला पुरेसं महत्त्व न दिलं जाणं ही देखील अनेकदा घडतं. शिवाय विचार करणं ही प्रक्रिया मानसिकदृष्ट्या थकवणारी असते.
अतिविचार करण्याचे तोटे :