वॉशिंग्टन : अमेरिका आणि अन्य काही भागांतून 8 एप्रिलला खग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. त्याबद्दल तिथे बरीच उत्सुकता आहे. अर्थातच, भारतात हे सूर्यग्रहण दिसणार नाही. मात्र, अंतराळातून असे खग्रास सूर्यग्रहण कसे दिसते, याबाबतही अनेकांना कुतूहल असू शकते. 'नासा'च्या एका अंतराळवीराने याबाबतचा अनुभव सांगितला आहे.
2016 मध्ये 'नासा'मधून निवृत्त झालेल्या विर्ट्स यांनी 'यूएसए टुडे'ला याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, 2015 मध्ये उत्तर अटलांटिक महासागराच्या वर अंतराळात एक ग्रहण दिसून आले होते. हे एक असे ग्रहण होते जे मला वाटते अतिशय कमी लोकांनी पाहिले असेल. मात्र, स्पेस स्टेशनवरून खाली पृथ्वीवर एका मोठ्या काळ्या वर्तुळाला पाहणे हा एक अनोखा अनुभव होता. मी आतापर्यंत जे काही पाहिले आहे त्यापेक्षा हा वेगळा अनुभव होता.
'नासा'च्या टीमने आधीच या ग्रहणाबाबत सांगितले होते. मात्र, खाली पृथ्वीवर पाहणे आणि एका काळ्या डागाला फिरत असताना बघणे, हा त्रासदायक अनुभव ठरू शकतो, असेही सांगण्यात आले होते. मात्र, वास्तवात हा अनुभव चांगलाच होता. मी पृथ्वीवरून अनेक ग्रहणे पाहिली आहेत आणि अंतराळातून एक ग्रहण पाहिले आहे. मी स्वतः 8 एप्रिलला होणार्या ग्रहणाची वाट पाहत आहे.