Dengue virus : भारतात कसा विकसित झाला डेंग्यूचा विषाणू?

Dengue virus : भारतात कसा विकसित झाला डेंग्यूचा विषाणू?

Published on

नवी दिल्ली : भारतीय विज्ञान संस्था (आयआयएससी)च्या संशोधकांच्या नेतृत्वाखाली एका बहुसंस्थागत संशोधनातून भारत व भारतीय उपखंडात गेल्या काही दशकांच्या काळात डेंग्यूचा विषाणू कसा विकसित झाला हे पाहण्यात आले. डेंग्यू हा रिषाणूजन्य व डासांकडून फैलावला जाणारा आजार गेल्या 50 वर्षांच्या काळात अधिकच वाढला आहे. प्रामुख्याने आग्नेय आशियाई देशांमध्ये डेंग्यूचा प्रकोप अधिक दिसून येतो. भारताकडे डेंग्यूविरुद्ध कोणतीही स्वदेशी लस नाही, काही लसी अन्य देशांमध्ये विकसित करण्यात आलेल्या आहेत.

'आयआयएससी'च्या केमिकल इंजिनिअरिंग विभागाचे सहायक प्राध्यापक राहुल रॉय यांनी सांगितले की डेंग्यूची भारतीय आवृत्ती किती वेगळी आहे हे पाहण्याचा आम्ही प्रयत्न केला. लस विकसित करण्यासाठी वापरलेल्या मूळ उपभेदांपेक्षा ती वेगळी असल्याचे आम्हाला दिसून आले. याबाबतच्या संशोधनाची माहिती 'प्लॉस पॅथोजेन्स' या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. संशोधकांनी सन 1956 ते 2018 या काळात अन्य संशोधकांकडून तसेच आपल्या टीमकडूनही संक्रमित रुग्णांमधून गोळा केलेल्या नमुन्यांचा अभ्यास केला. त्यामधून त्यांनी भारतातील डेंग्यूच्या सर्व उपलब्ध 408 अनुवंशिक अनुक्रमांचीही तपासणी केली.

डेंग्यू विषाणू (डेंग्यू 1,2,3 आणि 4) च्या चार व्यापक श्रेणी-सीरोटाईप आहेत. कम्प्युटेशनल विश्लेषणाचा उपयोग करीत टीमने तपासले की यापैकी प्रत्येक सीरोटाईप आपल्या पैतृक अनुक्रमापेक्षा, एकमेकांपेक्षा आणि अन्य वैश्विक अनुक्रमांपेक्षा कसा वेगळा आहे. रॉय यांनी सांगितले की अनुक्रम अतिशय जटील स्वरूपाने बदलत चालले असल्याचे आम्हाला आढळले. अलीकडच्या काही वर्षांमध्ये डेंग्यू-2 अधिक संपूर्ण देशात अधिक प्रभावी बनला आहे. एकेकाळी ज्या डेंग्यू-4 ला कमी संक्रमणशील मानले जात होते त्याने आता दक्षिण भारतात हात-पाय पसरले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news