घरगुती कामांमधून घटतात कॅलरीज!

घरगुती कामांमधून घटतात कॅलरीज!
Published on
Updated on

नवी दिल्ली ः वजन घटवण्यासाठी व्यायामशाळेत जाऊन व्यायामच करावा किंवा डाएटिंग करावे असे काही नसते, असे नेहमीच अनेक ज्येष्ठ लोक सांगत असतात. घरातील विविध कामांमधूनही आपण कॅलरीज घटवू शकतो व वजन नियंत्रणात ठेवू शकतो. यामुळे दुहेरी लाभ होतो, एक तर कॅलरीज बर्न होतात आणि घरची कामेही होतात! लॅन्सेट पब्लिक हेल्थ संशोधनातसुद्धा अलीकडेच हे मान्य करण्यात आले आहे, की घरगुती कामे करून हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि अगदी अकाली मृत्यूचा धोका कमी होऊ शकतो.

लादी पुसणे, केर काढणे, काचेच्या खिडक्या पुसणे यांसारख्या कामांमध्ये व्यायामाचे वेगेवेगळे प्रकार आपोआप होत असतात. उदाहरणार्थ, जमिनीवर बसून लादी पुसताना आपोआप आपल्याकडे डक वॉकसारखी शारीरिक हालचाल होते. केर काढताना, खिडक्या पुसताना वाकणे, वळणे या हालचाली करून स्ट्रेचिंग करता येते. अनेकदा हे सगळं करताना आपल्याला बॅलन्सिंग व्यायाम ज्याने शरीराला संतुलन साधण्याची सवय लागते ते ही करता येतात. आवराआवर करताना वस्तू, फर्निचर हलवत असल्यास वेट ट्रेनिंग सुद्धा होते. या सगळ्यापेक्षा आणखी महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता केल्यावर त्या वातावरणातील प्रसन्नता मानसिक आरोग्याला सुद्धा हातभार लावले.

थोडक्यात काय, तर एक तासभर जरी तुम्ही घराची स्वच्छता करण्यासाठी वेळ काढला तरी त्याचा प्रभाव 20 मिनिटांच्या व्यायामाइतका किंवा त्याहून जास्त असू शकतो. नेमकं कोणतं काम तुमची कशी मदत करू शकतं हे पाहा.. तुम्ही व्हॅक्युम क्लिनरने किंवा झाडूने अर्धा तास केरकचरा काढत असाल आणि तुमचे वजन 70 किलोग्रॅम असेल, तर साधारण 125 कॅलरीज बर्न होऊ शकतात. जर तुमचे वजन 80 किलोपेक्षा जास्त असेल तर 30 मिनिटांसाठी वाहनांची स्वच्छता करताना आपण 200 कॅलरीज बर्न करू शकता.

बेडवरील चादर बदलणे, किचन ओटा स्वच्छ करणे, पलंगाच्या खालून कचरा काढणे/ धूळ पुसणे ही कामं 30 मिनिटांसाठी केली तरी आपल्याला 200 कॅलरीजला सहज बर्न करता येऊ शकतं. ही सगळी माहिती खरी असली किंवा तज्ज्ञांनी सांगितलेली असली, तरी कृपया कोणतीही क्रिया करताना अतिरेक करू नका. खूपच वेगाने काम करायला जाणं, खूपच जड वस्तू उचलणं यामुळे तणाव वाढू शकतो. शक्यतो साफसफाईचा कालावधी हा आनंदी वेळ असूद्या, छान गाणी लावू शकता, स्वच्छता झाल्यावर आपल्याला एखादं बक्षीस देऊ शकता.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news