गॅस टाकी गळतीने घराला आग, श्रीगोंद्याच्या शिक्षक कॉलनीतील घटना; एकजण जखमी

गॅस टाकी गळतीने घराला आग, श्रीगोंद्याच्या शिक्षक कॉलनीतील घटना; एकजण जखमी
Published on
Updated on

श्रीगोंदा, पुढारी वृत्तसेवा: शहरातील मांडवगण रस्त्यावरील शिक्षक कॉलनी परिसरात राहणार्‍या प्रशांत टांकसाळ यांच्या घरात गॅस टाकीतून गॅस गळती झाल्याने संपूर्ण घराला आग लागली. या दुर्घटनेत जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. साईनाथ गॅस एजन्सीचे कर्मचारी पवन मखरे जखमी झाले आहेत. फायनान्स कंपनीत नोकरी करणारे प्रशांत टांकसाळ हे शिक्षक कॉलनी परिसरात कुटूंबियासह वास्तव्यास आहेत. घरातील गॅस संपल्याने त्यांनी साईनाथ गॅस एजन्सीमधून गॅस टाकी आणून जोडली. मात्र गॅस टाकीतून गॅस बाहेर येत नसल्याने त्यांनी संबंधित गॅस एजन्सीच्या कर्मचार्‍यांशी संपर्क साधला.

कर्मचारी पवन मखरे हे सदर ठिकाणी गॅस टाकीस गळती आहे की नाही, हे पाहणी करण्यासाठी गेले. गॅस टाकी अन् रेग्युलेटरची दुरुस्ती सुरू असतानाच टाकीतून निघणार्‍या गॅसने आग पकडली अन् क्षणात संपूर्ण घरात आग पसरली. गांभीर्य लक्षात घेऊन कर्मचार्‍याने गॅस टाकी बाहेर आणली. घरातील विद्युत पुरवठा खंडित केला. या आगीत कर्मचारी मखरे यांच्या चेहर्‍याला दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर श्रीगोंदा नगरपरिषदेच्या अग्निशमन यंत्राने आग विझवली. या दुर्घटनेत घरातले साहित्य जळून खाक झाले आहे. घरातील जवळपास सर्वच साहित्य जळून खाक झाले आहे. या दुर्घटनेत दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, या आगीच्या घटनेने परिसरात घबराट पसरली आहे. दरम्यान सायंकाळी उशिरा झालेल्या दुर्घटनेचा पंचनामा करण्याचे काम सुरू होते.

भरपाई मिळावी

प्रशांत टांकसाळ 'पुढारी'शी बोलताना म्हणाले, मी बाहेरगावाहून नोकरीसाठी इथे आलेलो आहे. गॅस गळतीच्या दुर्घटनेत संपूर्ण साहित्य जळून खाक झाले आहे. झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news