पुढारी ऑनलाईन : देशातील उत्तर, पूर्व, मध्य भागातील बहुतांश ठिकाणी सामान्य तापमानापेक्षा अधिक तापमानाची नोंद होणार आहे. दरवर्षीपेक्षा यंदाचा उन्हाळा अधिक कडक असणार आहे, अशी माहिती आढावा बैठकीत देण्यात आली. (Hotter summer in 2023)
IMD चे कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली हवामान विभागाची आढावा बैठक झाली. देशातील ईशान्य, पूर्व आणि मध्य भारतातील बहुतांश भाग आणि वायव्य भारतातील काही भागांमध्ये कमाल तापमान हे दरवर्षीच्या सामान्य तापमानापेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. (Hotter summer in 2023) तसेच मार्च २०२३ च्या शेवटच्या आठवड्यात गंगा नदीच्या मैदानी प्रदेशात आणि पूर्व भारातातील काही भागातील तापमान हे सर्वसामान्य तापमानापेक्षा २ ते ३ अंश सेल्सिअसने जास्त असू शकते, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
दरवर्षीच्या सामान्य उन्हाळ्यापेक्षा यंदाचा उन्हाळा अधिक कडक असल्याने हवामानात उष्णता मोठ्या प्रमाणात असणार आहे. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी संबंधित आव्हानाला तोंड देण्यासाठी पुरेशी तयारी करणे आवश्यक असल्याचे आवाहन या बैठकीत (Hotter summer in 2023) करण्यात आले आहे.
दक्षिण द्वीपकल्पीय भारत वगळता देशातील बहुतेक भागांमध्ये किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. मार्चच्या उर्वरित काळात उष्णतेच्या कोणत्याही लक्षणीय लाटा अपेक्षित नसल्याचे IMD ने म्हटले आहे. त्यामुळे या काळात आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे आवाहन IMD विभागाने देशातील आरोग्य यंत्रणेला केले आहे.
हेही वाचा :