गंगा स्नानाला निघालेल्‍या भाविकांवर काळाचा घाला, अपघातात १२ ठार

उत्तर प्रदेशमधील बरेली-फर्रुखाबाद महामार्गावरील भीषण अपघातानंतर वाहनांची झालेली अवस्‍था. 
उत्तर प्रदेशमधील बरेली-फर्रुखाबाद महामार्गावरील भीषण अपघातानंतर वाहनांची झालेली अवस्‍था. 

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : उत्तर प्रदेशमधील शहाजहानपूरमध्‍ये भीषण रस्‍ते अपघातात गंगा स्नानाला जाणारे १२ भाविक ठार झाले. ही दुर्घटना आज सकाळी साडेदहाच्‍या सुमारास बरेली-फर्रुखाबाद महामार्गावर आल्हागंजमधील सुगसुगी गावाजवळ घडल्‍याचे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे. दरम्‍यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे. ( Horrific Road Accident In Shahjahanpur )

स्‍थानिक पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, दमगाडा गावातील भाविक गंगा स्‍थानासाठी ऑटोमधून जात होते. बरेली-फर्रुखाबाद महामार्गावर सुगसुगी गावाजवळ भाविकांच्‍या ऑटोला ट्रकने धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, ऑटोचालकासह सर्व १२ भाविकांचा मृत्‍यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्‍थळावरुन फरार झाला आहे. या अपघाताची माहिती ग्रामस्‍थांनी पोलिसांना दिली. ट्रक ताब्यात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

दाट धुक्‍यामुळे अपघात

हरदोई डेपोची बस शहाजहानपूरहून हरदोईकडे जात असताना दाट धुक्यामुळे डंपरची समोरासमोर धडक झाली. या प्रकरणी गुन्‍हा दखल झाला असून, फरार चालकाचा शोध सुरु आहे, अशी माहिती शहाजहानपूरचे पोलीस अधीक्षक अशोक कुमार मीणा यांनी दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news