Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | मंगळवार, १६ जानेवारी २०२४

आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on
Updated on

मेष : जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो, ज्यामुळे आर्थिक लाभही मिळण्याची शक्यता. तुम्ही कार्यालयात अतिरिक्त वेळ घालवाल.

वृषभ : वेगवान पावले उचलून सर्वांचा आधारस्तंभ होण्याची गरज. सहकार्‍यांना प्रोत्साहित करून परिश्रम करायला भाग पाडावे लागेल.

मिथुन : आरोग्य चांगले राहील. प्रेमीला वेळ देण्याचा प्रयत्न कराल; पण गरजेच्या कामामुळे त्यांना वेळ देण्यात यशस्वी होणार नाही.

कर्क : कुटुंबातील सदस्यांना जीवनात विशेष स्थान असेल. आजचा दिवस आनंद आणि खुशीने परिपूर्ण अशा संदेशांनी भरलेला आहे.

सिंह : विनाकारण मानसिक त्रास करून घ्याल. सदोदित तुमच्यातील लहान मूल कार्यरत ठेवण्याची तुमची क्षमता गमावून बसाल.

कन्या : कामाबाबत आणि द़ृष्टिकोनाबाबत प्रामाणिक राहा. आपले द़ृढनिश्चय आणि कामातील कौशल्याची दखल घेतली जाईल.

तूळ : तुम्ही दिवसभर चिंतेत राहाल. व्यवसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळापर्यंत फायदेशीर ठरू शकेल. क्षुल्लक वाद विसरून जा.

वृश्चिक : तुमच्याजवळील समजूतदारपणाची गोड फळे मिळतील. घाईने घेतलेल्या निर्णयांमुळे दबाव येणार नाही, याची काळजी घ्या.

धनु : तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल. प्रलंबित देणी परत मिळवाल. कौटुंबिक बंधन, कर्तव्ये विसरू नका. मनोबल चांगले राहील.

मकर : प्रेमात आज तुम्ही एका विलक्षण खमंगपणाचा अनुभव घेणार आहात. महागड्या प्रकल्पावर सही करताना तुमचा सुज्ञपणा वापरा.

कुंभ : संध्याकाळच्या वेळी तुम्हाला वाटेल की, तुम्ही किती वेळ वाया घालवला. कामाच्या ठिकाणी सर्वकाही तुम्हाला अनुकूल असेल.

मीन : घराच्या सुशोभीकरणाऐवजी मुलांच्या गरजांकडेही लक्ष देणे महत्त्वाचे. दिवसाच्या उत्तरार्धात आराम करा. मनःशांती लाभेल.

– ज्यो. मंगेश महाडिक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news