चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.
मेष : श्रीगणेश सांगतात की, आज तुम्ही एक अद्भुत ऊर्जा आणि उत्साह अनुभवाल. संधीचा तुम्ही लाभ घ्याल. खूप दिवसांपासून प्रलंबित असणारे आर्थिक व्यवहार मार्गी लागतील. आव्हानांचा सामना करा यश तुमचेच असेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा अन्यथा मोठे नुकसान होवू शकते. घशाचा संसर्ग होऊ शकतो.
वृषभ : आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आजचा दिवस महत्त्वपूर्ण राहील, असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नातेसंबंध चांगले ठेवण्यासाठी तुमचे विशेष योगदान असेल. तरुणाई आपल्या कामात नवीन उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न करतील. मुलांना योग्य मार्गदर्शन करण्याची जबाबदारी तुमची आहे. प्रवास टाळणे हिताचे राहिल. घरातील बहुतांश कामे पूर्ण होतील. पती-पत्नीचे नाते मधूर होईल.
मिथुन : आज घरी पाहुणे येऊ शकतात. यामुळे तुम्ही दैनंदिन वेळापत्रक देखील बदलाल. दिवस तुमच्या आवडीनुसार जाईल. कोणावरही टीका करू नका. त्यामुळे तुमचीच प्रतिमा डागाळेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा, असा सल्ला श्रीगणेश देतात. पती-पत्नीचे नाते मधुर होऊ शकते. रक्तदाबाची समस्या असणार्यांनी काळजी घ्यावी.
कर्क : आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही नवीन यश मिळवू शकाल. उत्पनाचे नवीन मार्ग सापडू शकतात. मनोरंजनावर अतिरिक्त खर्चामुळे आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवा. व्यापारात नवीन करार होवू शकतो. जोडीदारासोबत एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. आहारावर नियंत्रण ठेवा, असा सल्ला श्रीगणेश देतात.
सिंह : श्रीगणेश सांगतात की, आज आर्थिक बाबतीत यश मिळेल. तुमच्या जवळच्या व्यक्तीला मदत केल्याने तुम्हाला आनंदाचा अनुभव येईल. टीकेमुळे तुमचे नाते आणखी बिघडू शकते. मित्रांशी मतभेद होण्याची शक्यता. भागीदारीशी संबंधित व्यवसायावर तुमची नजर असेल. जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. व्यायाम आणि योगासनांवर भर द्या.
कन्या : महत्त्वाची माहिती मिळविण्यात आज वेळ जाईल. दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू राहतील. वैयक्तिक गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. तुम्हाला भावनिक आधाराचीही गरज असेल. व्यवसायात व्यस्त असला तरी कुटुंबाला वेळ द्याल. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य लाभेल. पोटविकाराचा त्रास होण्याची शक्यता.
तूळ : श्रीगणेश म्हणतात की, आज तुम्ही तुमच्या स्वभावात सकारात्मक बदल कराल. कुटुंब आणि नातेवाईकांवर तुमचा प्रभाव कायम राहील. घरातील ज्येष्ठांच्या तब्येतीची चिंता राहील. तुमच्या अतिशिस्तीच्या आग्रहामुळे कुटुंबातील सदस्य नाराज होण्याची शक्यता. व्यवसाय वाढीसाठी नवीन योजना सुरू करण्याची योग्य वेळ आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आहारावर नियंत्रण ठेवा.
वृश्चिक : आज धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यात रुची वाढेल, असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवा. विचारांमध्ये नकारात्मकता येऊ देऊ नका. आपल्या बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा, असा सल्ला श्रीगणेश देतात. व्यवसायात आश्चर्यकारक यश मिळू शकते. वैवाहिक जीवनात थोडा तणाव जाणवेल. वाहने काळजीपूर्वक चालवा.
धनु : आजचा दिवस लाभदायक असल्याचे श्रीगणेश सांगतात. तुम्ही कुटुंबासोबत वेळ व्यतित कराल. नातेसंबंध मजबूत होतील. भावंडांमध्ये वाद होण्याची शक्यता. रागावर नियंत्रण ठेवा. तणावाचा परिणाम तुमच्या झोपेवरही होईल. कौटुंबिक जीवन सामान्य राहिल. महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी.
मकर : आज तुमची प्रतिष्ठा वाढेल. विशेष व्यक्तींची भेट होईल. तुमच्या बोलण्यातून सर्व अडथळ्यांवर मात करून तुम्ही पुढे जाऊ शकता. रखडलेली सरकारी कामे पूर्ण करताना अधिक मेहनत करावी लागेल, असा सल्ला श्रीगणेश देतात. व्यवसायात नवीन संपर्क लाभदायक ठरू शकतात. कोणत्याही समस्येवर तुमच्या जोडीदाराचा सल्ला घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. बदलत्या वातावरणामुळे ॲलर्जीचा त्रास होण्याची शक्यता.
कुंभ : आज तुम्ही तुमचे कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे हाताळू शकाल, असे श्रीगणेश सांगतात. सामाजिक उपक्रमातही सहभागी व्हाल. भावंडांसोबतचे नाते थोडे बिघडू शकते. बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा अन्यथा तुमचे नुकसान होवू शकते. कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनातील तणाव वाढू शकतो.
मीन : अभ्यास करणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम आहे. चांगले साहित्य आणि आध्यात्मिक कार्यांमध्ये रस घ्या. यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वात आश्चर्यकारक बदल होऊ शकतात. कधी कधी तुमचा हट्टी स्वभाव इतरांना त्रास देऊ शकतो. त्यामुळे स्वभावात थोडी लवचिकता ठेवा, असा सल्ला श्रीगणेश देतात. जोडीदाराच्या आरोग्याबाबत काही ताण येऊ शकतो. व्यायाम करताना काळजी घ्या.