वक्री शनिपालटाची या राशींना मिळणार शुभफळे; तुमच्या राशीवर असा होईल परिणाम

आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य

ग्रहवेध : पं. अभिजित कश्यप, होरामार्तंड

शनिवार दि. 4 जून रोजी कुंभ राशीत शनि वक्री होत आहे. वक्री शनि अतिशय मंद गतीने मकर राशीत प्रवेश करील या वर्षातील शनिचा हा दुसरा राशीप्रवेश आहे. हा दुसरा राशीप्रवेश मकर राशीत 12 जुलै रोजी होत आहे. 4 जून ते 12 जुलै या काळात व त्यानंतर 23 आक्टोंबर पर्यंत शनि वक्री राहणार आहे. 23 आक्टोंबरला शनि मार्गी होत आहे.

शनि ग्रह मुळात कर्तव्यकठोर मानला जातो. चांगले कर्म करणार्‍याला शनि भरभरून देतो. शनिच्या वक्री काळात साडेसाती तीव्र होत असते. मात्र शनि वक्रगत्या कुंभ या मूल त्रिकोण राशीतून आणि नंतर मकर या स्वराशीतून भ्रमण करीत असल्याने वक्री शनिची तीव्र फले सौम्य होतात.

मेष राशीच्या दशमातून आणि लाभातून होणारे हे भ्रमण मेष राशीला अनुकूल आहे. व्यवसायात प्रगती होईल. नोकरीमध्ये समाधानकारक स्थिती राहील. वृषभ राशीला भाग्यातून आणि दशमातून शनिभ्रमण होत आहे. शनि हा वृषभ राशीचा कारक ग्रह असल्याने वृषभ राशीला या शनिची चांगली फळे मिळतील. उद्योग, व्यवसाय, नोकरीत अनुकूलता प्राप्‍त होईल. मिथुन राशीला नवव्या आणि आठव्या भावात शनि आहे. काहींना आकस्मिक धनलाभ होऊ शकेल. कर्क राशीला शनि भ्रमण सातव्या व आठव्या स्थानातून होत आहे. कौटुंबिक जीवनात काही अडचणी निर्माण होऊ शकतील. सिंह राशीला शनि सहावा व सातवा आहे. शत्रूवर मात करण्याचे योग आहेत. कन्या राशीला पंचम आणि सहाव्या स्थानातून शनिभ्रमण असल्याने प्रयत्न आणि कष्टातून यश मिळू शकेल.

तूळ राशीचा शनि कारक आहे. चतुर्थ व पंचम स्थानातील शनि भ्रमण या राशीच्या व्यक्‍तींना स्थावर मालमत्तेतील अडचणी दूर करण्यास सहायकारी ठरू शकेल. वृश्‍चिक राशीच्या पराक्रमात व चतुर्थात शनिभ्रमण असून उद्योग व्यवसायात उत्साहाचे वातावरण राहील. धनु राशीला हा शनि दुसरा व तिसरा असून दीर्घकाळ गुंतलेले पैसे, अडकलेल्या रकमा वसूल व्हायला मदत होऊ शकेल. मकर राशीला प्रथम व द्वितीय स्थानी शनि येत असून आरोग्य सुधारेल, रेंगाळलेले प्रश्‍न मार्गी लागतील. कुंभ राशीला लग्‍नी व व्ययस्थानात शनि येत आहे. त्यामुळे अनावश्यक कामासाठी खर्च होण्याचे योग आहेत. मीन राशीला लाभ आणि व्ययस्थानातून शनि भ्रमण होत असल्याने काहींची मित्रांकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे.

दीर्घकाळ रेंगाळलेले मालमत्तेचे प्रश्‍न, कौटुंबिक अडचणी, शत्रुपीडा अशा समस्या सौम्य व्हाव्यात, त्यातून मार्ग निघावा, यासाठी श्री शनि देवाचे दर शनिवारी दर्शन घ्यावे. शनिला तेल, उडीद आणि मीठ वहावे. शनि हा दाता आहे. शनि पूजनाने अनुकूल फळे मिळू शकतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news