Hong Kong : हाँगकाँगकडून पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; ५ लाख विमान तिकिटे देणार मोफत

Hong Kong : हाँगकाँगकडून पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; ५ लाख विमान तिकिटे देणार मोफत
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोरोनाची साथ आटोक्यात आल्यानंतर पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हाँगकाँगने HK$2bn ($254.8m; £224.3m) किमतीची 500,000 विमान तिकिटे मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. हाँगकाँग  (Hong Kong) सरकारने सप्टेंबर महिन्यात कोरोना निर्बंध मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरात येणार्‍या लोकांना यापुढे हॉटेल क्वारंटाईन होण्याची किंवा शहरात फिरताना निगेटिव्ह कोविड चाचणी अहवाल दाखवण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले आहे.

या पार्श्वभूमीवर हाँगकाँग (Hong Kong)  पर्यटन मंडळाचे कार्यकारी संचालक, डेन चेंग यांनी सांगितले की, मोफत तिकीट देण्यासाठी विमानतळ प्राधिकरण एअरलाइन कंपन्यांसोबतच्या कराराला अंतिम स्वरूप देईल. त्यानंतर आम्ही विनामूल्य हवाई तिकिटांसाठी जाहीरात देणार आहोत. कोरोना महामारीच्या काळात हाँगकाँग एअरलाइन्सला आर्थिक पाठबळ देण्यासाठी विकत घेतलेली मोफत तिकिटे पुढील वर्षी शहराच्या विमानतळ प्राधिकरणाद्वारे इनबाउंड आणि आउटबाउंड प्रवाशांना वितरित केली जाणार आहेत. मोफत हवाई तिकीटांमुळे हाँगकाँगची लोकप्रियता जगभरात वाढेल. एक आवडते पर्यटन स्थळ म्हणून हाँगकाँगची ओळख निर्माण होण्यास मदत होईल

मार्केट रिसर्च फर्म युरोमॉनिटर इंटरनॅशनलचे वरिष्ठ विश्लेषक प्रुडेन्स लाय यांच्या मते, मोफत विमान तिकीट ऑफरमुळे हाँगकाँगची लोकप्रियता वाढण्यास मदत होणार आहे. या ऑफरमुळे हाँगकाँगची लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून प्रतिष्ठा सुधारण्याच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे. 2022 च्या पहिल्या आठ महिन्यांत शहराला 184,000 पर्यटकांनी भेट दिल्याची नोंद आहे. कोरोना साथीच्या पूर्वीच्या तुलनेत पर्यटकांच्या संख्येत हे प्रमाण खूपच कमी आहे. 2019 मध्ये एकूण 56 दशलक्ष लोकांनी हाँगकाँगला भेट दिली होती.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news