stomach pain | पोटदुखीने त्रस्त आहात? घरच्या घरी करा ‘हे’ उपाय

stomach pain
stomach pain
Published on
Updated on

पोटात जंत होणे हे सर्वांच्याच परिचयाचे आहे. अनेकवेळा कृमी झाल्यानेही पोट बिघडलेले असते. या व्याधीवर वेळीच उपचार होणे आवश्यक असते. पण बरेचवेळा जंत झाल्याचे लक्षात येत नाही. अशा वेळी घरातील सर्वच लोकांनी विशेषत: ऋतू बदलतात तेव्हा म्हणजे उन्हाळा सुरू होताना काळजी घेतली तर पोटदुखी, जंत किंवा गॅसेस टाळता येतील. (stomach pain)

संबंधित बातम्या 

जंत

लहान मुलांमध्ये पोटात जंत होण्याचे प्रमाण अधिक असते. वावडिंग पाण्यात उकळून ते पाणी 15 दिवस प्यायला दिल्याने जंतांचा नाश होतो. दर सहा महिन्यांनी 15 दिवस असे पाणी द्यावे म्हणजे जंत होत नाहीत.

पोटातील कृमी

पोटात कृमीचा त्रास लहान मुलांप्रमाणेच बर्‍याचवेळा मोठ्यांनाही होत असतो. यावरही वावडिंग घालून उकळलेले पाणी 15 दिवस पिण्याने उपयोग होतो. दुसरा उपाय म्हणजे रोठा सुपारी भांडेभर पाण्यात घालून, ते पाणी पाव होईपर्यंत उकळून काढा करावा. हे पाणी प्यायल्याने कृमींचा नाश होतो.

लहान मुलांचा कफ

लहान मुलांत सर्दी होण्याचे प्रमाण अधिक असते. यातूनच खोकला अथवा छातीत कफ भरतो. यावर 20 ग्रॅम खोबरेल तेल म्हणजे तीन चमचे तेल, त्यात चार-पाच थेंब निलगिरी तेल एकत्र करून नाक, छातीला चोळल्याने कफ कमी होतो.

रक्तवाढीसाठी

आजकाल बर्‍याच जणांना रक्तक्षय म्हणजे अ‍ॅनिमियाचा त्रास होत असतो. यावर खजुराच्या चार-पाच बिया एक महिनाभर खाल्ल्याने रक्त वाढण्यास मदत होते. (stomach pain)

गॅसेस धरणे

बर्‍याच वेळा वेळी-अवेळी जेवण, जड पदार्थांचे सेवन यामुळे पोटात वायू धरतो. शरीराची हालचाल कमी झाल्याने वृद्ध व्यक्तींनाही हा त्रास अधिक होतो. त्यावर लिंबू सरबत पिणे उपयुक्त ठरते. तसेच एक भाग मिरे व सहा भाग साखर यांची सुंठवड्यासारखी पावडर करून ती थोडी थोडी खावी. हीच पावडर कफ, दम लागणे, ठसका यावर उपयुक्त ठरते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news