PM Modi on Gaza hospital attack: गाझा हॉस्पिटल हल्ल्यात सहभागी असणाऱ्यांना जबाबदार धरा: पंतप्रधान मोदी

PM Modi on Gaza hospital attack: गाझा हॉस्पिटल हल्ल्यात सहभागी असणाऱ्यांना जबाबदार धरा: पंतप्रधान मोदी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : गाझामधील अल अहली रुग्णालयावर आज (दि. १८) इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यात सुमारे ५०० नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. "गाझामधील अल अहली हॉस्पिटलमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल मोठा धक्का बसला. पीडितांच्या कुटुंबियांबद्दल आमच्या मनःपूर्वक संवेदना आणि जखमी लोक लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना. इस्त्रायल- हमासात संघर्षात नागरिकांच्या जीविताची मोठी हानी होणे, ही गंभीर आणि चिंतेची बाब आहे. यात सहभागी असलेल्यांना जबाबदार धरले पाहिजे, अशी मागणी पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. (PM Modi on Gaza hospital attack)

संबंधित बातम्या 

बुधवारी गाझा येथील हॉस्पिटलमध्ये झालेल्या हल्ल्यात मुलांसह शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला. हमासने या हल्ल्यासाठी इस्रायलला जबाबदार धरले आहे, तर इस्रायली संरक्षण दलाने या हल्ल्यामागे पॅलेस्टिनी गट इस्लामिक जिहादला जबाबदार धरले आहे. इस्लामिक जिहादने याचा इन्कार केला आहे. इस्रायली सैन्याने याचा व्हिडिओ शेअर केला आहे. (PM Modi on Gaza hospital attack)

आयडीएफने दावा केला आहे की, या हल्ल्यात हॉस्पिटलच्या आजूबाजूच्या इमारतींचे फारसे नुकसान झालेले नाही. या हल्ल्यात लक्ष्य इस्त्राईल होते, पण रॉकेट यशस्वीपणे प्रक्षेपित न झाल्याने ते हॉस्पिटलवर पडले, असा दावा इस्रायलने केला आहे.

दरम्यान, हमासने इस्रायलला लक्ष्य करून दि. ७ ऑक्टोबररोजी रॉकेट डागल्यानंतर इस्रायल-हमास संघर्ष सुरू झाला. त्यानंतर इस्रायलने प्रत्युत्तरादाखल युद्ध घोषित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संघर्षावरील आपल्या पहिल्या संदेशात म्हटले आहे की, या कठीण प्रसंगी भारत इस्रायलसोबत एकजुटीने उभा आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news