HIV vaccine : लवकरच मिळू शकते ‘एचआयव्ही’वरील लस

HIV vaccine : लवकरच मिळू शकते ‘एचआयव्ही’वरील लस

न्यूयॉर्क : एचआयव्ही/एड्सवरील HIV vaccine) उपचारासाठी पहिली लस जगाला लवकरच मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. याबाबतची माहिती 'जागतिक एड्स दिना'निमित्त 'सायन्स' नावाच्या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये एका लसीच्या पहिल्या क्लिनिकल ट्रायलचे परिणाम सांगण्यात आले. वैज्ञानिकांच्या मते, ही लस एचआयव्हीविरुद्ध 97 टक्क्यांपर्यंत परिणामकारक आहे.

एक्वायर्ड इम्यूनो डेफिशिएन्सी सिंड्रोम (एड्स) हा आजार 'ह्युमन इम्युनो डेफिशिएन्सी व्हायरस' (एचआयव्ही) (HIV vaccine) नामक विषाणूपासून होतो. हा विषाणू चिम्पांझीमधून माणसात विसाव्या शतकात संक्रमित झाला होता असे मानले जाते. बाधित व्यक्तीचे वीर्य, योनीद्रव्य आणि रक्ताच्या संपर्कात आल्याने या आजाराचा फैलाव होतो. सध्या या आजारावर कोणताही रामबाण उपाय नाही. त्यामुळे ही नवी लस आता नव्या आशा निर्माण करणारी ठरली आहे.

या लसीचे नाव 'इओडी-जीटी 860 एमईआर' असे आहे. याबाबतच्या संशोधनात 48 निरोगी लोकांवर चाचणी घेण्यात आली. त्यांचे वय 18 ते 50 वर्षे होते. 18 लोकांना पहिला डोस 20 मायक्रोग्रॅमचा देण्यात आला. त्यानंतर आठ आठवड्यांनी तितकाच दुसरा डोस देण्यात आला. अन्य 18 लोकांना आठ आठवड्यांच्या अंतराने 100 मायक्रोग्रॅमचे (HIV vaccine) दोन डोस देण्यात आले.

अन्य बारा लोकांना सलाईन प्लेसिबो देण्यात आला. प्लेसिबो हे काही औषध नाही. औषध घेतल्यानंतर व्यक्तीवर मानसिक रूपाने कोणता आणि किती परिणाम होतो हे जाणून घेण्यासाठी त्याचा वापर केला जातो. ज्या 36 लोकांना लस देण्यात आली त्यापैकी 35 जणांवर लसीचा पहिला (HIV vaccine) डोस देताच परिणाम दिसून आला. त्यांच्यामध्ये 'बी सेल्स' म्हणजेच 'बी पेशी' वाढल्याचे दिसून आले. पांढर्‍या रक्तपेशींचा हा एक असा प्रकार आहे जो रोगप्रतिकारक यंत्रणेत आजारांविरुद्ध अँटिबॉडीज बनवतो.

लसीच्या दुसर्‍या डोसनंतर लोकांची रोगप्रतिकारक शक्ती आणखी वाढल्याचे दिसून आले. आता ही लस एचआयव्ही/ एड्सच्या रुग्णांवर कसे काम करते हे पाहिले जाईल. इंटरनॅशनल एड्स व्हॅक्सिन (HIV vaccine) इनिशिएटिव्हच्या डेटानुसार जगभरात 3 कोटी 80 लाख लोक एचआयव्हीसह जगत आहेत. सध्या या प्राणघातक विषाणूविरुद्ध वीसपेक्षा अधिक लसींच्या क्लिनिकल ट्रायल सुरू आहेत. जगभरात आतापर्यंत एड्समुळे 4 कोटी लोकांना प्राण गमवावे लागले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news