कुर्ला : पूर्व द्रुतगती मार्गावर हिट अँड रन, दोघांचा मृत्यू, चालक फरार

कुर्ला : पूर्व द्रुतगती मार्गावर हिट अँड रन, दोघांचा मृत्यू, चालक फरार
Published on
Updated on

कुर्ला, पुढारी वृत्तसेवा : पूर्व द्रुतगती मार्गावर सोमवार दि ३१ रोजी सकाळी घडलेल्या हिट अँड रन प्रकरणात दोन जणांचा मृत्यू झाला असून चालक अजून ही फरार आहे. वांद्रे कुर्ला जोड पुलावरून एमएच १२ सीआर २७९२ ही मोटार कार ठाण्याच्या दिशेने जात होती. या वेळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगात या वाहनाने चुना भट्टी जवळील एव्हराड नगर बस स्थानकावर उभे असलेल्या दोन पादचाऱ्यांना जोरदार धडक दिली आणि पळ काढला.

याची माहिती येथील नागरिकांनी पोलिसांना देताच चुना भट्टी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी अवस्थेत असलेल्या अपघातग्रस्तांना सायनच्या टिळक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र या दोन्ही अपघातग्रस्तांचा मृत्यू झाला. यातील एक मयत बाबासाहेब नाथा काळे (५५) तर दुसरे अनोळखी ६० वर्षीय आहेत.

अपघात केलेल्या वाहनात एक चालक आणि एक प्रवासी होता. त्याने अपघात करून घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर त्याने कार कुर्ला नेहरू नगर येथील शिव श्रुष्टी मध्ये असलेल्या कामगार मनपा शाळेच्या मागे उभी केली. त्यावर बाजूच्या मोटारकार वरील कव्हर टाकून तिथून ही पळ काढला. मात्र पोलिसांनी सदर वाहन शोधून काढून ताब्यात घेतले आहे. गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून चुना भट्टी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news