पुढारी ऑनलाईन डेस्क : दिग्दर्शित संजय लीला भन्याळी याच्या 'हिरामंडी' या वेबसीरीजमधून अभिनेत्री संजीदा शेख खूपच चर्चेत आली आहे. या वेबसारीजमधील तिच्या अभिनयाचा चाहत्यांनी भरभरून कौतुक केलं आहे. चित्रपट कारकिर्दीसोबत तिने अनेक मालिकेतही अभिनयाचा ठसा उमठवलाय. सिने करिअरसोबत तिचे वैयक्तिक आयुष्य कसे आहे याचीही माहिती घेवूयात. पतीपासून अचानक घटस्फोट झाल्यानंतर ती एकटीने सिंगल मदर बनून मुलीचं संगोपन करत आहे.
अभिनेत्री संजीदा शेख हिने तिच्या करिअरची सुरुवात बॉलिवूड अभिनेता आणि बिंग बी अमिताभ बच्चन यांच्या 'बागबान' या चित्रपटातून केली होती. या चित्रपटात तिने एक छोटी भूमिका साकारली होती. मात्र, तिला खुपच वाहव्वा मिळाली. या चित्रपटाच्या यशानंतर संजीदा छोट्या पडद्याकडे वळली. यानंतर तिच्या 'क्या होगा निम्मो का' या टीव्ही मालिकेतील अभिनयाचे खूपच केलं गेलं. यामुळे संजीदा चांगलीच लोकप्रिय झाली.
काही वर्षे टीव्ही मालिकेत काम केल्यानंतर संजीदा शेख यांनी अभिनेता आमिर अलीसोबत लग्नगाढ बांधली. दोघांची पहिली भेट 'क्या दिल में है' च्या वेळी झाली होती. याच दरम्यान दोघांची चांगली मैत्री झाली आणि नंतर त्याचे रूपांरत प्रेमात झाले. दोघांनी 'नच बलिए 3' हा शो एकत्रित जिंकला. यानंतर दोघांनी लग्न करून सुखी संसार सुरूवात केली.
मात्र, अनाचक २०२१ मध्ये संजीदा आणि आमिरने लग्नाच्या ९ वर्षांनंतर एकमेकांपासून वेगळे होण्याच्या निर्णय घेतल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. दोघांची टीव्हीवरील सर्वात प्रेमळ कपलपैकी एक म्हणून ओळख होती. यानंतर संजीदाने २०२२ मध्ये आमिर अलीशी अधिकृतपणे घटस्फोट घेतला. मात्र, दोघेही वेगळे का झाले? याचे कारण आजतागायत समजू शकलेले नाही.
दरम्यान संजीदा आणि आमिरने सरोगसीच्या माध्यमातून पालक बनले होते. अचानक झालेल्या घटस्फोटानंतर त्याची मुलगी आयरा संजीदासोबत राहायला लागली. तेव्हापासून आजपर्यत ती एकटीच तिचा सांभाळ करत आहे. तेव्हा आयरा ४ वर्षांची होती.
संजीदा भलेही एकटीच राहत असली तरी तिच्या कमाईच्या बाबतीत कोणाही हात धरू शकत नाही. रिपोर्टच्या माहितीनुसार, संजीदाची एकूण संपत्ती २५ कोटी रुपयांची आहे. तर 'हिरामंडी' चित्रपटासाठी जवळपास तिने ४० लाख रुपये मानधन घेतले आहे.
हेही वाचा