Hingoli’s historic Dussehra : १६९ वर्षांची परंपरा लाभलेला हिंगोलीचा ऐतिहासिक दसरा महोत्सव

Hingoli's historic Dussehra
Hingoli's historic Dussehra
Published on
Updated on

हिंगोली ; गजानन लोंढे तब्बल 169 वर्षाची परंपरा लाभलेला देशातील दुसर्‍या क्रमांकाचा दसरा महोत्सव Hingoli's historic Dussehra म्हणून हिंगोली येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवाची ओळख आहे. यंदा हा दसरा महोत्सव 28 सप्टेंबर ते 28 ऑक्टोबर या दरम्यान साजरा होत आहे. हिंगोलीच्या दसरा महोत्सवाला लोकाश्रम मिळाल्याने या दसर्‍याला विशेष महत्व आहे.

शहरातील जलेश्‍वर मंदिरात शनिवारी कार्यक्रमाने येथभल रामलिला मैनावर ऐतिहासिक दसरा महोत्सवाला प्रारंभ Hingoli's historic Dussehra झाला आहे. प्रमुख आकर्षण असलेल्या कृषी व औद्योगिक प्रदर्शनाचे उद्घाटन (रविवारी) जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते करण्यात आले. दसरा किंवा विजयादशमी म्हणजे सत्प्रवृत्तीने असत्यावर व सद‍्गुणांनी दुर्गूणांवर मिळवलेला विजय होय. पौराणिक संदर्भानुसार श्रीरामाने रावणावर मिळविलेला विजय साजरा करण्यासाठी प्राचीन काळापासून देशभरात विजयादशमी उत्साहाने साजरी केली जाते.

कर्नाटकात म्हैसूर येथे वाडियार या राजघराण्याने सुरू केलेला दसरा महोत्सव Hingoli's historic Dussehra देशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. जवळजवळ तितकीच प्रदीर्घ परंपरा हिंगोलीच्या सार्वजनिक दसरा महोत्सवाला लाभली आहे. हिंगोली व म्हैसूरच्या दसरा महेात्सवातील मुख्य फरक म्हणजे म्हैसूरच्या दसर्‍याला राजाश्रय लाभला तर हिंगोलीच्या दसर्‍याला लोकाश्रय लाभलेला आहे. हा लोकाश्रय इतका उदार आहे की, म्हैसूरच्या दसरा महोत्सवानंतर क्रमांक दोनचा दसरा म्हणून हिंगोलीच्या दसर्‍याची देशपातळीवर दखल घेतली जाते. हिंगोली हे विदर्भ व मराठवाड्याच्या सीमेवर कयाधू नदीच्या काठावर वसलेले एक शहर आहे. वंजारगढी म्हणून या शहराची एकेकाळी ख्याती होती. संत नामदेव महाराज, विठोबा खेचर, संत जनाबाई यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या भुमीला खाकीबाबा मठ, दत्तमंदिर, गोपाललाल मंदिर, खटकाळी हनुमान आदी देवस्थळांमुळे धार्मिक चेहरा प्राप्‍त झाला आहे.

कयाधू नदीच्या काठावरील खाकीबाबा मठ म्हणजे आखाडा परंपरेतील मठ होय. उत्तरेतून हिंगोलीत आलेली ब्रिटीश छावणीत वास्तव्य करणारी मंडळी ही सैनिकी पेशातील असल्याने त्यांच्या पेशाच्या परंपरेनुसार ही दसर्‍याच्या दिवशी त्यांच्या शस्त्रास्त्रांची पूजा करीत असत. फार पुर्वी कयाधू नदीच्या काठावरील खाकीबाबा मठ हा आखाडा परंपरेतील असल्याने तेथेही शस्त्रास्त्रे असत. तसेच त्या परिसरात राम मंदिर असल्याने दसर्‍याच्या दिवशीही ही मंडळी खाकीबाबा मठात जाऊ लागली. त्यातूनच मठाच्या आवारात रावण दहनाची परंपरा दसर्‍याच्या Hingoli's historic Dussehra दिवशी सुरू झाल्याचे शहरातील जुनी-जाणती मंडळी सांगतात. नंतर ही परंपरा हिंगोलीकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली.

आतिषबाजी ठरतेय लक्षवेधी

येथील रामलिला मैदानावर विजयादशमीच्या Hingoli's historic Dussehra दिवशी रावण दहनाचा कार्यक्रम साजरा होतो. या कार्यक्रमाला जिल्ह्यासह परजिल्ह्यातून हजारो भाविक उपस्थिती दर्शवित असतात. रावण दहनापुर्वी मोठ्या प्रमाणात आतिषबाजी करण्यात येते. ही आतिषबाजी उपस्थितांसाठी पर्वणी असते. तसेच रावण दहनाचा क्षण डोळ्यात साठविण्यासाठी हजारो प्रेक्षक आतूर असतात.

सरकारी महोत्सव झाल्याने नाराजीचा सूर

तब्बल पावणेदोनशे वर्षापेक्षा अधिक वर्षाची परंपरा असलेल्या हिंगोलीचा ऐतिहासिक दसरा Hingoli's historic Dussehra महोत्सव मागील काही वर्षांपासून सरकारी महेात्सव झाल्याने नाराजीचा सूर उमटू लागला आहे. सर्वसामान्यांना यात सहभागी होता येत नसल्याने हा लोकोत्सव प्रशासनाच्या दावणीला बांधल्या गेल्याचा आरोप सातत्याने होत आला आहे. अत्यूच्च धार्मिक मुल्य असलेला दसरा महोत्सव हिंगोलीत एक सामाजिक उत्सव बनला. परंतू आता मात्र दसरा समिती अर्थकारणाच्या मागे लागल्याने आज घडीला दसरा महोत्सव हा आनंदोत्सव राहिला नाही. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडण्यासारखा महोत्सव असावा अशी अपेक्षा जनतेमधून व्यक्‍त होत आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news