पुढारी ऑनलाइन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर ते मुंबई जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाची पाहणी केली. नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या महामार्गाची पाहणी करण्यासाठी नागपुरातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सोबत एकाच वाहनातून रवाना झाले. यावेळी नव्या कोऱ्या गाडीचे स्टेअरिंग उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हाती होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या बाजूच्या सीटवर बसले होते.
हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने हा समृद्धी महामार्ग सुरू होत आहे
हा महामार्ग विदर्भ मराठवाड्यासोबतच महाराष्ट्राच्या दृष्टीने गेम चेंजर ठरेल या रस्त्याच्या दुतर्फा समृद्धी येईल.
नागपूर ते मुंबई जोडणाऱ्या समृद्धी महामार्गावर नागपूर ते शिर्डी महामार्गाची पाहणी करण्यासाठी नागपुरातून हे दोघेही आज सोबत रवाना झाले.