Hindi tv stars Diwali Celebration : हिंदी कलाकारांनी जागवल्या दिवाळीच्या आठवणी

Hindi tv stars Diwali Celebration
Hindi tv stars Diwali Celebration

पुढारी ऑनलाईन डेस्क : Hindi tv stars Diwali Celebration : दिवाळी हा सण म्हणजे, काळोखावरील प्रकाशाच्या, वाईटावरील चांगल्याच्या आणि अज्ञानावरील ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक आहे. या दिवशी समस्त देशातील लोक आपआपल्या घरी दिवे आणि पणत्यांनी सुशोभित करतात. घरापुढे सुंदर रांगोळी रेखाटतात आणि एकमेकांना भेटवस्तू देतात. दरम्यान लोकप्रिय कलाकारांनी दिवाळीसाठी सेटवरून अनुभव शेअर केला आहे.

संबंधित बातम्या 

'वंशज' मालिकेत युविका महाजनची भूमिका साकालेली अंजली तत्रारी म्हणाली की, 'वर्षभर मी आवडत्या दिवाळीची वाट पाहत असते. अखेर तो दिवस आला असून जुन्या परंपरा मनापासून पाळते. घराची साफसफाई करण्यापासून ते चविष्ट फराळावर ताव मारण्यापर्यंत सगळेच मी करते. दिव्यांच्या माळांनी मी घराची रोषणाई करते. यंदाच्या दिवाळीत रांगोळी काढणे आणि माझ्या मित्र-मैत्रिणी आणि वंशजच्या सह-कलाकारांसोबत कार्ड पार्टी असणार आहे!.'

'पुष्पा इम्पॉसिबल' मालिकेत पुष्पाची भूमिका साकारणारी करुणा पांडे म्हणाली की, 'मला पहिल्यापासून दिवाळी हा सण फार आवडतो. दिव्यांविषयी मला विशेष आकर्षण आहे. माझी आई दिवाळीसाठी फराळ करायची त्याची आम्ही आतुरतेने वाट बघायचो. आज देखील मिठाईसमोर माझी संपूर्ण शरणागती असते. पुष्पा इम्पॉसिबल मालिकेत पुष्पाची भूमिका करताना लहानपणी माझ्या संपूर्ण कुटुंबासह साजरी केलेली दिवाळी मला आठवते. त्या आठवणी मला आयुष्यात चांगली कामगिरी करण्याचे बळ देतात.'

भानुप्रताप महाजन ही व्यक्तिरेखा साकारणारा पुनीत इस्सार म्हणतो की, 'दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. दिवाळी आपले घर आणि जीवन प्रकाशमय करते. लहानपणीच्या दिवाळीच्या आठवणी अजून मला खुणावतात. आपल्या देशात दिवाळी हा फार मोठा आनंद पसरवणारा सण आहे. त्याचप्रमाणे दिवाळी हा सण माझ्यात आशा, प्रकाश आणि जबाबदारीची जाणीव जागवतो.'

'पश्मीना' मालिकेत प्रीतीची भूमिका करणारी गौरी प्रधान म्हणते की, 'मी जम्मूची आहे, पण मला काश्मीरमधील दिवाळी साजरी करण्याची संधी कधीच मिळाली नाही, विशेषतः माझा पती हितेन याच्यासोबत. यावर्षीची दिवाळी लक्षणीय आहे, कारण यावर्षी 'पश्मीना – धागे मोहब्बत के' या नवीन मालिकेच्या टीमसोबत हा सण साजरा करण्याची संधी मिळाली. हितेन आणि मी असे ठरवले आहे की, आमच्या मुलांना इथेच बोलावून घ्यायचे. अशा रीतीने मी माझे कुटुंब आणि… '

राघवची भूमिका करणारा निशांत मलकानी म्हणतो की, 'काश्मीरच्या धुंद-मनोहर परिसरात दिवाळीचा सण साजरा करणे माझ्यासाठी स्वप्नवत आहे. माझ्या जन्म दुबईचा आहे. दिवाळीच्या माझ्या आठवणी कोलकाता येथील काली पूजेच्या परंपरेशी जोडलेल्या आहेत. पण यावर्षी काश्मीरमध्ये आहे. या शूटिंगच्या निमित्ताने याच ठिकाणी आम्ही दिवाळी साजरी करणार आहोत. परंपरा आणि संस्कृतीचा संयोग बघणार आणि पश्मीनाच्या टीमसोबत मजा करणार आहोत. सगळा पारंपरिक सोहळा चालू आहे आणि मी त्याचा मनमुराद आनंद उपभोगत आहे.'

वंशज मालिकेत दिग्विजयची भूमिका करणारा माहिर पांधी म्हणतो की, 'ज्याप्रमाणे दिवाळी अंधार आणि प्रकाश यांच्यातील नाते दाखविते, आपल्या स्वभावात विविध विरोधाभासी वृत्तींचा गोफ विणलेला असतो. मी फिटनेस सांभाळणारा आहे, पण दिवाळी ही अशी वेळ असते, जेव्हा मी स्वतः फराळाचा आस्वाद घेतो. मी दिवाळीची आणि स्वादिष्ट फराळाची आतुरतेने वाट पाहत आहे.' यामुळे छोट्या पडद्यावरील 'वंशज', 'पुष्पा इम्पॉसिबल' आणि 'पश्मीना – धागे मोहब्बत के' या मालिकेसाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ( Hindi tv stars Diwali Celebration )

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news