Himachal Pradesh Election : हिमाचल प्रदेशमधील मतदान प्रक्रिया समाप्त; ६५.९५ टक्के मतदान

Himachal Pradesh Election : हिमाचल प्रदेशमधील मतदान प्रक्रिया समाप्त; ६५.९५ टक्के मतदान
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिमाचल प्रदेशच्या ६८ विधानसभा जागेसाठीची मतदान प्रक्रिया शनिवारी (दि. १२) पार पडली. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ६५.९५ टक्के मतदान झाले आहे. सर्व मतदान केंद्रांवर सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली. यासाठी ७८८१ मतदान केंद्र नियोजित करण्यात आले होते. (Himachal Pradesh Election)

कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती मतदान ?

सर्वाधिक मतदान हे सिरमौर जिल्ह्यामध्ये आणि सर्वात कमी लाहौल स्फिती जिल्ह्यात मतदान झाले. निवडणूक आयोगानुसार संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सिरमौरमध्ये ७२.३५ %, विलासपूर येथे ६५.७२ टक्के, हमीरपूर येथे ६४.७४%, कांगडा येथे ६३.९५%, मंडी येथे ६६.७५%, शिमला येथे ६५.६६%, सोलन येथे ६७.६७% इतके मतदान झाले. (Himachal Pradesh Election)

२०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीतील मतदान

विलासपूर मध्ये ७६.५४ %, चम्बा मध्ये ७४.१०%, हमीरपूर मध्ये ७०.६४ %, कांगडा मध्ये ७२.९७%, किन्नौर मध्ये ७५.५१%, कुल्लू मध्ये ७८.८८%, लाहौल स्पीती मध्ये ७३.१७%, मंडी मध्ये ७६.३५%, शिमला मध्ये ७३.४३%, सिरमौर मध्ये ८१.५१%, सोलनमध्ये ७८.१०%, ऊना मध्ये ७६.८२% इतके मतदान झाले होते.

शनिवारी मतदान प्रक्रिया संपली तरीही मतदानासाठी अजूनही लांब  रांगा पहायला मिळाल्या. ही मतमोजणी ८ डिसेंबरला होणार आहे. येत्या काही दिवसांतच निवडणूक रिंगणात उतरलेल्या ४१२ उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. या निवडणुकीमध्ये २४ महिलांचा समावेश आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news