Indo-Pak border : पंजाबमधील तरन तारन जिल्ह्यात सापडले ५ किलो हेरॉइनसह हेक्साकॉप्टर ड्रोन

Indo-Pak border
Indo-Pak border

पुढारी ऑनलाईन : भारत-पाकिस्तान सीमेजवळ (Indo-Pak border) सुरक्षा जवानांना पंजाबमधील तरन तारन जिल्ह्यात पुन्हा एकदा ड्रोन सापडले आहे. सापडलेले हेक्साकॉप्टर ड्रोन हे नवीन तंत्रज्ञानाने युक्त आहे. या ड्रोनसह ५ किलो हेरॉइनही सापडले आहे, अशी माहिती तरन तारन पोलिसांनी दिली आहे.

भारत पाकिस्तान सीमेवर सापडलेल्या या ड्रोनसंदर्भात तरन तारन पोलिस आणि सीमा सुरक्षा दल एकत्रितरित्या शोध मोहिम राबवत आहेत, अशी माहिती पंजाब जिल्हा पोलिस अधिकाऱ्याने ट्विट वरून दिली आहे. सीमा सुरक्षा दलाचे महासंचालकांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे की, या वर्षभरात सुरक्षा दलाने जवळपास १६ ड्रोन (Indo-Pak border) पाडले आहेत.

पुढे ते म्हणाले, सुरक्षा दलाकडून ड्रोनला प्रतिरोध करणारी यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. भारत पाकिस्तान भागातील काही ठराविक ठिकाणी अँटी-ड्रोन प्रणाली बसविण्यात आली आहे. मात्र अद्याप सीमेवरील (Indo-Pak border) सर्व भागात विस्तृतपणे ही यंत्रणा कार्यान्वित नाही. लवकरच ही अँटी-ड्रोन प्रणाली भारत-पाकिस्तान सीमेवर बसविण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news