अमली पदार्थ
अमली पदार्थ

मुंबई विमानतळावर ४० कोटींचे हेरॉईन जप्त : झिम्बावेतील दाम्पत्याला अटक

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई विमानतळावर 40 कोटींचे 8 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले. हेरॉईनची तस्करी करणाऱ्या झिम्बावेतील दाम्पत्याला मुंबई विमानतळावर अटक केली आहे, अशी माहिती महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिका-यांनी दिली. रोनाल्ड माकुंबे ( वय 56) आणि त्यांची पत्नी माकुंबे लव्हनेस (वय 52) असे अटक करण्‍यात आलेल्‍या दाम्‍पत्‍याचे नाव आहे. न

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई विमानतळावर अदिस अबाबाहून आलेल्या दाम्पत्याला रोखण्‍यात आले. अदिस अबाबा हे अवैध ड्रग्जचे ट्रान्झिट हब मानले जाते. या दाम्पत्याला त्यांच्याजवळ काही संशयास्पद आहे का ?, असे विचारण्यात आले. यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिली. त्यांच्या सामानाची कसून झडती घेतली असता तपकिरी पावडर आढळून आली. या पावडरची तपासणी केल्यावर अंमली पदार्थ असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर दाम्पत्याने केपटाऊनमधून ड्रग्ज आणल्याची कबुली दिली.

हे ड्रग्ज भारतात नेण्यासाठी शेरॉन नावाच्या महिलेने त्यांना भारताच्या फ्लाइट तिकिटांसह प्रतिबंधित वस्तू दिल्या होत्या. तसेच त्यांना ५०० अमेरिकन डॉलर्सही देण्याचे आमिषही दाखवले होते.

हेही वाचा : 

logo
Pudhari News
pudhari.news