‘इथे’ लोक चहा पिण्यासाठी जातात दुसर्‍या देशात !

‘इथे’ लोक चहा पिण्यासाठी जातात दुसर्‍या देशात !

अ‍ॅम्स्टरडॅम : भारतात एक गाव असे आहे, जिथे घरातील एक खोली भारतात आणि एक म्यानमारमध्ये! या गावातील लोकांना दोन्ही देशांचे नागरिकत्व आहे. अशा अनोख्या सीमा जगात इतरत्रही पाहायला मिळतात. नेदरलँड आणि बेल्जियमची अशीच अनोखी सीमा असलेले एक गाव आहे. तिथे अनेक रेस्टॉरंट्समध्ये मधूनच दोन्ही देशांची सीमा गेलेली असते. याठिकाणी एका देशातून दुसर्‍या देशात चहा पिण्यासाठी जावे लागते!

एक सामान्य समज असा आहे की, सीमेवर नेहमीच तणावाचे वातावरण असते, सैनिकांची गस्त असते. कधी कधी सीमेवर दोन देशांदरम्यान चकमकीही घडतात; मात्र सर्वच सीमा अशा नसतात. नेदरलँड आणि बेल्जियममधील सीमाही त्याला अपवाद आहे. या दोन्ही देशांमध्ये शांतता करार झालेला आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधून लोक सीमा पार करीत असतात.

या सीमेचा इतिहास रोमांचक आणि जुना आहे. ही सीमा सन 1843 मध्ये आखण्यात आली. त्यावेळी दोन्ही देशांमध्ये ट्रीटी ऑफ मास्ट्रिच्ट हा शांतता करार करण्यात आला. गावाच्या मध्यभागातूनच ही सीमा जाते. या सीमेने अनेक घरे व हॉटेलही विभागलेली आहेत. त्यामुळे साहजिकच लोक ही आंतरराष्ट्रीय सीमा रोजच ओलांडत अलीकडे-पलीकडे येत-जात असतात. ही सीमा पर्यटकांचेही एक खास आकर्षण आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news