helmet : हेल्मेटशिवाय सुरूच होणार नाही वाहन!

helmet
helmet
Published on
Updated on

इंदूर ः दुचाकी वाहन चालवत असताना डोक्यावर हेल्मेट (helmet) घालणे हे सुरक्षेच्या द़ृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते. सध्या रस्त्यावरील अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन हेल्मेट सुरक्षेसाठी अनेक वेगवेगळ्या मोहिमा राबवल्या जातात. मात्र, लोक त्यांची अंमलबजावणी करत नाहीत आणि त्यामुळेच अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हेच लक्षात घेऊन 'इंदूर'च्या एका स्टार्टअपने असे उपकरण बनवले आहे की, ते 'टू व्हीलर'मध्ये बसवल्यानंतर जर कोणी हेल्मेटशिवाय ते सुरू केले तर ते वाहन सुरू होणार नाही, म्हणजेच तो हेल्मेटशिवाय गाडी चालवू शकत नाही.

हे उपकरण केवळ 12 दिवसांत तयार केले गेले. हे सिक्युरिटीलेस डिव्हाईस 31 जानेवारीला लाँच करण्यात आले आहे. हे उपकरण भारतात प्रथमच बनवले गेले आहे. या डिव्हाईसचा आकार 3 बाय 1.5 सेमी आहे. हे उपकरण (helmet)v स्पीड मीटरजवळ कोणत्याही दुचाकीमध्ये ते मॅन्युअली बसवता येते. त्याला जोडलेला कॅमेरा स्पीड मीटरजवळ बसवला आहे जो सतत त्यावर लक्ष ठेवतो.

त्यानंतर वाहनाचा चालक आपल्या सीटवर बसतो आणि त्याने हेल्मेट (helmet) घातले नसल्यास वाहनाचे इंजिन सुरू होत नाही. चालकाने हेल्मेट घातले असेल तर गाडी सुरू होते. जर चालकाने हेल्मेट घातले नसेल आणि त्याच्या मागे असलेल्या व्यक्तीने हेल्मेट घातले असेल तर वाहन सुरू होणार नाही. हे डिव्हाईस पूर्णपणे वॉटरप्रूफ आहे. त्याची किंमत फक्त 15,000 ते 2,000 च्या दरम्यान असेल.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news