Helicopter crashed In Nepal | नेपाळमध्ये सिमरिक एअरचे हेलिकॉप्टर कोसळले, पायलट सुरक्षित

Helicopter crashed In Nepal | नेपाळमध्ये सिमरिक एअरचे हेलिकॉप्टर कोसळले, पायलट सुरक्षित
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : सिमरिक एअर या खासगी कंपनीचे हेलिकॉप्टर नेपाळमधील संखुवासभा जिल्ह्यात आज (दि.०५) दुपारी कोसळले. भारतासाद्वारे अनुदानित अरुण-III जलविद्युत प्रकल्पासाठी बांधकाम साहित्य पुरवत असताना, नेपाळच्या हद्दीत हे हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे, असे वृत्त एएनआय ने दिले आहे. (Helicopter crashed In Nepal)

सिमरिक एअरलाइन्सचे हेलिकॉप्टर अरुण-III जलविद्युत प्रकल्पाशी संबंधित साहित्य घेऊन जात होते. जे भारताच्या सतलज जल विद्युत निगमच्या माध्यमातून विकसित केले जात होते, अशी माहिती येथील संखुवासभा जिल्हा पोलीस कार्यालयाने दिली आहे. पोलिसांचे पथक अपघातस्थळी पाठवण्यात आले असून शोधमोहिम सुरू आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news