पुणे; पुढारी वृत्तसेवा : उत्तर भारतातील पावसाचा परिणाम काही प्रमाणात विदर्भात दिसणार आहे. 17 ते 19 ऑगस्टदरम्यान त्या भागात पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. मात्र, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात कोरडे वातावरण राहणार आहे.
देशात उत्तराखंड, आसाम, बिहार, उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर भागात जोरदार पाऊस सुरू असून, उत्तराखंडात 14 रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्या भागात 300 मि.मी. पेक्षा जास्त पाऊस गेल्या 24 तासांत झाला असून, आसाममधील चेरापुंजी येथेही 200 मि.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली.
महाराष्ट्रात फक्त कोकणात हलका ते मध्यम पाऊस सुरू असून, उर्वरित राज्य गेल्या दहा दिवसांपासून कोरडे आहे. तुरळक भागात रिमझिम पाऊस अधून-मधून पडत आहे. उत्तर भारतात सुरू असलेल्या पावसाचा परिणाम राज्यात 17 ऑगस्टपासून विदर्भात जाणवणार आहे. विदर्भात 17 ते 19 पर्यंत मध्यम पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
हेही वाचा