पुण्यात पावसाचे धूमशान; विजांचा कडकडाट अन् तुफान पाऊस

सोसाट्याचा वारा अन् विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने रविवारी दाणादाण उडवून दिली. पावसाने शहराला अक्षरशः झोडपून काढले.
सोसाट्याचा वारा अन् विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने रविवारी दाणादाण उडवून दिली. पावसाने शहराला अक्षरशः झोडपून काढले.
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अंगाची काहिली करणार्‍या उन्हामुळे पुणेकर उकाड्याने हैराण झाले होते; मात्र रविवारी सायंकाळी आलेल्या पावसाने शहराला अक्षरशः झोडपून काढले. सोसाट्याचा वारा अन् विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने दाणादाण उडवून दिली.
वादळी पावसामुळे अनेक भागांत झाडे उन्मळून पडली. दोन तासांत शहरात सरासरी 4 ते 5 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली.

नारायणपेठ परिसरात धो-धो पाऊस बसरला. त्यामुळे वाहनांचा वेग मंदावला होता.
नारायणपेठ परिसरात धो-धो पाऊस बसरला. त्यामुळे वाहनांचा वेग मंदावला होता.

गेले तीन दिवस राज्याच्या विविध भागांत पाऊस पडत आहे. मात्र, पुणे शहरात जोर कमी होता. रविवारी मात्र पावसाने ती कसर भरून काढत शहराला अक्षरशः झोडपून काढले. जिल्ह्यातही अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे हिंगणेवाडी प्राथमिक शाळेवरील छताचे आणि धान्य साठवणीच्या शेडचे पत्रे उडून गेले.

<br />पिंपरी-चिंचवडच्या काही भागांत रविवारी सायंकाळच्या दरम्यान पावसाच्या<br />सरी कोसळल्या.

पिंपरी-चिंचवडच्या काही भागांत रविवारी सायंकाळच्या दरम्यान पावसाच्या
सरी कोसळल्या.

सकाळपासून शहरात कडक ऊन होते. आकाशात ढगही होते. त्यामुळे प्रचंड उकाडा जाणवत होता. मात्र, दुपारी 3 नंतर वातावरणात अचानक बदल झाला.आकाशात काळोख दाटून आला. दुपारी 4 वाजता जोरदार पावसाला सुरुवात झाली. वार्‍याचा वेग इतका होता, की नागरिकांंना आहे त्या ठिकाणी थांबावे लागले. रविवारमुळे पिकनिकसाठी बाहेर पडलेले नागरिक मिळेल त्या आडोशाला थांबले, मात्र वार्‍याचा वेग इतका होता की आडोशातील लोकांनाही पावसाने चिंब भिजवले. विजांचा कडकडाट सुरू असल्याने वाहतूक मंदावली. अनेक ठिकाणी पत्रे उडाली व झाडे उन्मळून पडली. रस्त्यावर पाण्याचे लोंढे वाहू लागले.

वडगाव मावळ : पवनानगर आणि धरण परिसरात रविवारी (दि. 9) वादळी वार्‍यासह गारांचा पाऊस झाला.
वडगाव मावळ : पवनानगर आणि धरण परिसरात रविवारी (दि. 9) वादळी वार्‍यासह गारांचा पाऊस झाला.

तळी साचल्याने वाहनधारकांना पुढचे काहीच दिसत नव्हते. तळजाई टेकडी ते गजानन महाराज मंदिर परिसरात पावसाचा जोर प्रचंड असल्याने या भागातून वाट काढणे अवघड झाले होते. शहरातील सर्व पेठा, उपनगरांत जोरदार पाऊस झाला. सुमारे तासभर जोरदार पाऊस झाला. दुपारी 4 ते 5 पर्यंत विजांचा कडकडाट अन् पाऊस सुरूच होता. त्यानंतर जोर कमी झाला, पण पाऊस सायंकाळी 6 पर्यंत सुरूच होता.आडोशाला अडकलेल्या नगारिकांनी शेवटी घरी भिजत जाणे पसंत केले.

आंबेगाव परिसरातील त्रिमूर्ती चौक ते दत्तनगरकडे जाणार्‍या राजमाता भुयारी मार्गात साठलेले पावसाचे पाणी.
आंबेगाव परिसरातील त्रिमूर्ती चौक ते दत्तनगरकडे जाणार्‍या राजमाता भुयारी मार्गात साठलेले पावसाचे पाणी.

आजही पाऊस…
रविवारी शहरात दुपारपर्यंत पावसाचा अंदाज नव्हता, मात्र 4 नंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. असाच पाऊस सोमवारी दि. 10 रोजी होण्याची शक्यता आहे. मात्र, मंगळवारपासून शहरात पाऊस कमी होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने दिला.

झाडपडीच्या 31 घटना..
शहरात वार्‍यासह पावसाचा जोर चांगलाच होता. सोसाट्याच्या वार्‍याने अनेक भागांत झाडपडी सुरू होताच अग्निशमन विभागाचे फोन खणखणू लागले. दोन तासांत पंधरापेक्षा जास्त भागात 31 ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. भवानी पेठेत होर्डिंग्सचा सांगडा अग्निशमन दलाने वेळीच बाजूला केल्यामुळे अनर्थ टळला. कोरेगाव पार्क, कोंढवा, कर्वेनगर, वारजे, लुलानगर, शंकरशेठ रोड, मीरा सोसायटी या भागात मोठी झाडपडी झाल्याने वाहनधारकांची मोठी गैरसोय झाली.अग्निशमन विभागाचे जवान रात्री उशिरापर्यंत या सर्व भागांत जाऊन रस्त्यावर पडलेली झाडे हटवत होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news