मुंबई : पुढारी वृत्तसेवा मुंबई शहर व उपनगरात सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने मुंबईकरांना अक्षरश: झोडपून काढले. पश्चिम उपनगरात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. मरोळ येथे तब्बल 145 मिमी पाऊस झाला. दक्षिण मुंबईतही मलबार हिल, कुलाबा, मुंबई महापालिका कार्यालय, माझगाव परिसरासह पूर्व उपनगरात विक्रोळीमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली.
मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी तुंबले होते. सकाळी पावसाचा जोर कमी झाल्यामुळे पाण्याचा तातडीने निचरा झाला. रात्रीची वेळ असल्यामुळे वाहतुकीवर फारसा परिणाम झाला नाही. मध्य व पश्चिम रेल्वेची लोकल सेवा विलंबाने सुरू होती. दरम्यान सध्या पावसाचा जोर कमी असला तरी रिमझिम सुरूच आहे.
सकाळपर्यंत 12 ठिकाणी झाडे व झाडाच्या फांद्या पडल्या. 5 ठिकाणी घर व घराच्या भिंती कोसळल्या. तर 10 ठिकाणी किरकोळ शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. यात कोणीही जखमी झाले नाही. दरम्यान शहर व उपनगरात पावसाच्या जोरदार व अती जोरदार सरी पडण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तवली आहे.
हेही वाचा :