Mumbai weather update : मुंबईत पुन्हा मुसळधार; दादर, रावळी कॅम्प येथे तासाभरात २८ मिमी पाऊस

file photo
file photo

मुंबई : पुढारी वृत्तसेवा; मुंबई व शहरात शुक्रवारी विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी सकाळी पुन्हा हजेरी लावली. सकाळी 7 ते 8 या तासाभरात रावळी कॅम्प येथे सर्वाधिक 28 मिमी तर सायन माटुंगा येथे 21 मिमी पावसाची नोंद झाली. पूर्व पश्चिम उपनगरातही तासाभरात मुसळधार पाऊस झाला. (Mumbai weather update)

मुंबईत गेल्या दोन आठवड्यांपासून पडत असलेल्या पावसाने काल (शुक्रवार) थोडी उसंती घेतली. सकाळी आकाश निरभ्र असल्यामुळे ऊन पडले होते. अधून मधून पडलेली एखादी सर वगळता संपूर्ण दिवसभर पाऊस नव्हता. दरम्‍यान आज (शनिवार) पहाटेपासून पुन्हा पावसाने मुंबईत हजेरी लावली. सकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत सर्वाधिक पाऊस झाला. काही सकल भागात पाणी साचले होते, मात्र याचा वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही. मात्र पावसामुळे वाहतूक काही प्रमाणात मंदावली होती. पश्चिम व मध्य रेल्वेच्या उपनगरीय गाड्या (लोकल) मात्र वेळापत्रकानुसार सुरू होत्या.

Mumbai weather update सकाळी 7 ते 8 पडलेला पाऊस..

शहर 

दादर अग्निशमन केंद्र – 28 मिमी
रावळी कॅम्प – 28 मिमी
माटुंगा सायन – 21 मिमी
परळ – 18 मिमी
वडाळा – 17 मिमी
ब्रिटानिया – 12 मिमी

पूर्व उपनगर 

गोवंडी -17 मिमी
कुर्ला – 12 मिमी

पश्चिम उपनगर 

कुपर – 18 मिमी
सांताक्रुझ – 18 मिमी
अंधेरी – 17
वर्सोवा पंपिंग – 14

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news