हृदयाशिवाय जगलेला ‘हार्टलेस मॅन’!

हृदयाशिवाय जगलेला ‘हार्टलेस मॅन’!

न्यूयॉर्क : काही अवयव असेही असतात, ज्याशिवाय माणूस एक मिनीटही जगू शकत नाही. यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे हृदय. याशिवाय जगण्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. पण, एक व्यक्ती अशीही आहे, जी एक महिन्यापेक्षा जास्त काळ हृदयाचे ठोके चालू नसतानाही जगली आणि याचमुळे त्या व्यक्तीला जगातील पहिला हार्टलेस मॅन असे ओळखले जाते.

लॅडबायबल वेबसाईटच्या वृत्तानुसार, 2011 मध्ये टेक्सास हार्ट इन्स्टिट्यूटच्या दोन डॉक्टरांनी एक उपकरण तयार केले होते. हृदयाचा ठोका नसतानाही हे उपकरण माणसाला जिवंत ठेवू शकत होते, हे त्याचे वैशिष्ट्य होते. या दोन डॉक्टरांनी पहिल्यांदा आठ महिन्यांच्या बछड्यावर हे उपकरण वापरले. त्यांनी या बछड्याचे हृदय काढून टाकले आणि त्याच्या जागी बनवलेले यंत्र बसवले. डॉक्टरांनी एकूण 38 बछड्यांवर त्याचा प्रयोग केला. तो पूर्ण यशस्वी झाल्यानंतर हे उपकरण मानवांवर वापरण्याचा विचार केला आणि त्यासाठी क्रेग लुईसची निवड करण्यात आली.

क्रेग 55 वर्षांचा होता आणि तो अमायलोइडोसिस नावाच्या आजाराने ग्रस्त होता. या आजारामुळे क्रेग 12 तासांपेक्षा जास्त जगू शकणार नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. याचवेळी क्रेगची पत्नी लिंडाने डॉ. बिली कोहन आणि डॉ. बझ फ्रेझियर यांच्याशी संपर्क साधला. लिंडाच्या विनंतीनुसार, डॉ. कोहान आणि डॉ. फ्रेझियर यांनी तिच्या पतीचे खराब झालेले हृदय काढून टाकले आणि त्यांचे कृत्रिम उपकरण या व्यक्तीच्या शरीरात बसवले. उपकरण बसवल्यानंतर क्रेग हळूहळू बरा होऊ लागला. पण, नंतर त्याची प्रकृती बिघडू लागली. यकृत आणि किडनीवरील हल्ला घातक ठरला. यानंतर त्याच वर्षी एप्रिलमध्ये त्याचा मृत्यू झाला. पण, मृत्यूपूर्वी क्रेगने इतिहास रचला. पल्सलेस हार्टसोबत तो एक महिन्याहून अधिक काळ जगण्यात यशस्वी झाला आणि वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांती घडली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news