Heart Attack : फ्लूमुळे हृदयविकाराचा धोका दुप्पट!

Heart Attack : फ्लूमुळे हृदयविकाराचा धोका दुप्पट!
Published on
Updated on

सध्या व्हायरल फ्लूचे प्रमाण वाढले असून फ्लूचे स्वरूपही सतत बदलत आहे. मानवी आरोग्यावर याचा विपरित परिणाम होत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. वारंवार होणारी सर्दी, पडसे याकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे आहे. अलीकडेच झालेल्या अभ्यासावरून वैद्यकीय शास्त्रज्ञांनी दिलेल्या इशार्‍यानुसार, कोरोनादरम्यान हृदयातील रक्तवाहिन्यांमधील गुठळ्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. यामध्ये हृदयाच्या धमन्यांमध्ये रक्तपुरवठा करताना अडथळा निर्माण होत असतो. अशा वेळी हृदयविकाराचा झटका Heart Attack येण्याची शक्यता जास्त असल्याचे सांगण्यात आले आहे. याचे कारण फ्लूचे स्वरूप वारंवार बदलत असून मानवी आरोग्यावर वाईट परिणाम होताना दिसून येत आहे.

या पार्श्वभूमीवर हृदयविकाराचा धोका Heart Attack वाढण्यामागे व्हायरल फ्लूच कारणीभूत आहे का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत; पण याबद्दल आणखी कोणत्याही प्रकारचे तथ्य जगासमोर आले नसून संशोधन सुरू असल्याचे समजते. कोरोनामुळे हृदयविकाराचा वाढता धोका व्हायरल फ्लूमध्येही आहे का, याचा शोध संशोधकांच्या चमूकडून घेतला जात आहे. तसेच आणखी एका संशोधनातून असे आढळून आले आहे की, फ्लूचा संसर्ग झाल्यानंतर हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. अनेक लोकांना फ्लूनंतर एक आठवड्याने हृदयविकाराचा झटका आल्याचे संशोधकांना आढळून आले आहे.

सध्याचे फ्लूचे बदलते स्वरूप लक्षात घेता ब्लड क्लॉटिंगचा धोका वाढवण्याची शक्यता आहे. यामध्ये शरीराच्या आतून रक्त जमा होऊन रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे हृदयविकाराचा धोका Heart Attack वाढण्याची जास्त शक्यता असते. याचे कारण कोरोना आणि फ्लूच्या लक्षणांमध्ये बर्‍यापैकी साम्य असल्याचे आढळते. त्यामुळे फ्लूची लक्षणे हलक्यात न घेता सजग राहणे आवश्यक आहे. फ्लू आणि हृदयविकाराचा झटका यामध्ये काही संबंध आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी एक संशोधन करण्यात आले आहे.

यामध्ये अशाच रुग्णांचा समावेश करण्यात आला होता, ज्यांना हृदयविकाराचा झटका आला म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले. यासाठी प्रयोगशाळेतून माहिती गोळा करण्यात आली होती. यानंतर संशोधकांच्या चमूला दिसून आले की, एकूण 401 लोकांना फ्लूमधून बरे झाल्यानंतर एक वर्षाच्या आत हृदयविकाराचा एक झटका नक्की आला होता. यात हृदयविकाराचा झटका Heart Attack आलेल्यांपैकी 25 जण असे होते, जे एका आठवड्याच्या आतच आले होते. या सर्व पार्श्वभूमीवर संशोधकांच्या चमूने असे निष्कर्ष दिले की, फ्लूचे वाढणे हे कोरोना अचानक वाढण्यासारखेच आहे. त्यामुळे फ्लूची लक्षणे जाणवत असतील, तर दुर्लक्ष करणे धोकायदायक ठरू शकते. परिणामी, बदलत्या वातावरणात आरोग्याबाबत विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

डॉ. अजिंक्य बोरूडे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news