Ragi Roti : नाचणीच्या भाकरीत असतात ‘हे’ आरोग्यदायी गुण…

Ragi Roti : नाचणीच्या भाकरीत असतात ‘हे’ आरोग्यदायी गुण…
Published on
Updated on

नवी दिल्ली : चालू वर्ष हे संयुक्त राष्ट्रसंघाने 'मिलेट्स' म्हणजेच भरडधान्यांचे वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. या भरडधान्यांमध्ये Ragi Roti नाचणी, बाजरी यासारख्या अनेक प्रकारच्या धान्यांचा समावेश होतो. बाजरीची भाकरी अनेक ठिकाणी आवडीने खाल्ली जाते. भोगीच्या सणावेळी तर प्रत्येक घरात बाजरीची भाकरी आणि राळ्याचा भात असतोच. नाचणीची भाकरीही अशीच चविष्ट असते व तिच्यामध्ये अनेक आरोग्यदायी गुणही असतात. विशेषतः न्याहारीच्या वेळी ही भाकरी खावी, असे आहारतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

नाचणीच्या भाकरीतून Ragi Roti शरीराला अनेक पोषक घटक मिळतात. या भाकरीत व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, बी-कॉम्प्लेक्स, आयर्न, कॅल्शियम, अंटिऑक्सिडंट्स, प्रोटिन, फायबर, कॅलरी, गुड फॅट्स असतात. ज्यातून आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात. नाचणीची भाकरी खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो. संपूर्ण शरीरात यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहतो. शरीरात जर का आयर्न म्हणजेच लोहाची कमतरता असेल, तर नाचणीची भाकरी उपायकारक आहे. नाचणीची भाकरी खाल्ल्यानं आपली हाडं अधिक मजबूत राहतात. त्यामुळे आपल्याला अधिकाधिक शक्ती प्राप्त होते. ऑस्टियोपोरोसिसच्या समस्येतही नाचणीची भाकरी गुणकारी आहे. नाचणीच्या भाकरीत अमिनो अ‍ॅसिडचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे त्वचा आणि केस निरोगी राहतात. तसेच दातांचे आरोग्यही चांगले राहते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news