Headache : डोकेदुखीने हैराण आहात? ‘हे’ घरगुती उपाय करून पाहा

Headache
Headache
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या कामाचा तणाव, वातावरणात होत असलेला सततचा बदलामुळे अनेकांना डोकेदुखीचा त्रासाला सामाेरे जावे लागते. यावर तत्‍काळ आराम मिळावा यासाठी औषधे घेत असतात. मात्र, सतत औषधे घेतलीत तर त्याचे आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.  त्यामुळे डोकेदुखीवर कोणते घरगुती उपाय करावेत या. हे जाणून घेऊया. हे उपाय तुम्हाला डोकेदुखीपासून आराम मिळण्यास फायदेशीर ठरतील. (Headache)

गाजराच्या रसाचे सेवन करा (Headache)

गाजरामध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्वे असतात. गाजर खाल्ल्यास शरीराला विटामिन्स आणि मिनरल्स मिळू शकतात. गाजराचे रसाचे सेवन केल्यास डोकेदुखीचा त्रास कमी होऊ शकतो. तसेच गाजराचा रस हा आरोग्यासाठीही फायदेशीर असतो. गाजराच्या रसाशिवाय रोज एक  सफरचंद खात असाल तर डोकेदुखीचा त्रास कमी होऊ शकतो.

लवंग सेवानाने मिळू शकतो आराम (Headache)

रोज लवंगचे सेवन करणेही आरोग्यासाठी चांगले असते. रोज लवंग खात असाल तर डोकेदुखीच्या समस्या तुम्हाला उद्भवणार नाही. डोकेदुखीचा त्रास होत असल्यास लवंग रूमालात घेऊन त्याचा सुगंधही घेऊ शकता. त्यामुळे डाेकेदुखीवर आराम मिळताे.(Headache)

डोकेदुखीला पळविण्यासाठी लिंबू खूप उपयुक्त आहे. म्हणून कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून ते सेवन करावं. गॅसेसचा त्रास होत असेल तरही लिंबूपाणी फायदेशीर ठरते. लिंबू पाण्‍यात  सेंधव मीठ टाकल्याने डोकेदुखी आणि अपचनाचा त्रास कमी हाेण्‍यास मदत हाेते.(Headache)

तुळशीच्या पानांचा रस ठरतो गुणकारी

अनेकदा डिहायड्रेशनमुळे डोकं दुखतं. अशावेळा तुळशीच्या पानांचा रस गुणकारी ठरतो. पेलाभर पाण्यात तुळशीची 10-15 पानं घालून ते उकळून घ्या. जास्त उकळल्यानंतर उरलेलं निम्मं पाण्यात एक चमचा मध मिसळा आणि प्या. यामुळे डोकेदुखीपासून त्वरित आराम मिळेल. (Headache)

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news