पुणे : वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह सात पोलिसांचे जणांचे तडकाफडकी निलंबन

पुणे : वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह सात पोलिसांचे जणांचे तडकाफडकी निलंबन

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  चार अदखलपात्र गुन्ह्यांची गांभीर्याने दखल न घेतल्यामुळे सहकार नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत टोळक्याने वाहनांची तोडफोड केली. या घटनेला जबाबदार धरत पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी सहकार नगर पोलिसांचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांच्यासह तब्बल सात जणांचे तडकाफडकी निलंबन केले आहे. त्यामध्ये गुन्हे निरीक्षक मनोज शेंडगे, सहायक पोलिस निरीक्षक समीर शेंडे, उपनिरीक्षक हसन मुलाणी, उपनिरीक्षक मारूती वाघमारे, पोलिस हवालदार संदीप पाटकुळे आणि पोलिस हवालदार विनायक जांभळे यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले. निलंबनामध्ये अटी व शर्तीचे पालक करण्याचेही आदेशात म्हटले आहे. एकाच पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाची आणि कर्मचार्‍यांची एकाचवेळी सात जणांचे निलंबन करण्याची ही मागील काही वर्षातील पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे.

या कारणामुळे झाले निलंबन
जुन महिन्यात एकूण चार अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. गुन्ह्यातील आरोपी आणि फिर्यादी यांच्यावर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई न केल्यामुळे तसेच तक्रारीची गांभीर्याने दखल घेतल्याचे निष्पन्न झाले. कर्तव्यात हलगर्जीपणा केल्यामुळे परस्पर विरोधी गुन्हे दाखल होऊन पोलिस दलाची प्रतिमा मलीन झाली. हे गुन्हेगार न तपासणे, त्यांच्या हालचालींची माहिती न ठेवणे, तक्रार गांभिर्याने न घेणे, कायद्याचा वचक न ठेवणे अशा पध्दतीचा ठपका सर्वावर ठेवण्यात आला आहे.

निलंबनात घातलेल्या अटी
निलंबन करण्यात आलेल्या सर्वांना निलंबनाच्या कालावधीत खासगी नोकरी किंवा धंदा स्विकारून अर्थाजन केले नाही याबाबतचे प्रमाणपत्र देउन निर्वाह भत्याची रक्कम स्विकारावी. तसे न केल्यास निर्वाह भत्यातील रक्कम गमवाल असेही नमुद करण्यात आले आहे.

हे ही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news