‘पीएफ’चा दावा नामंजूर झालाय?

‘पीएफ’चा दावा नामंजूर झालाय?

काहीवेळा कोणतेही संयुक्तिक कारण न सांगता अधिकारी पीएफचा दावा नामंजूर करतात. परिणामी, खातेदार आर्थिक अडचणीत येतात. अर्थात, अशा तक्रारी अनेकदा 'ईपीएफओ'कडे केल्या जातात.

घराचे बांधकाम, पाल्यांचे शिक्षण, विवाह समारंभ, आजारपण आदी अत्यावश्यक कारणांसाठी पीएफचे पैसे उपयुक्त ठरतात. अशावेळी पुरेशी कागदपत्रे आणि कारण योग्य असेल, तर पीएफ नाकारण्याची शक्यता कमीच राहते. त्याचवेळी पीएफकडे दावा करताना नियमांची माहिती असणे गरजेचे आहे, जेणेकरून आपला दावा नाकारला जाणार नाही.

आपण पीएफसाठी अर्ज केला असेल आणि तो नामंजूर झाल्याने अस्वस्थ असाल, तर काळजी करू नका. 'इपीएफओ'ने (Employees Provident Fund Organization)अशा अडचणींवर मार्ग काढण्यासाठी गेल्या वर्षी गाईडलाईन जारी केली आहे. खातेदारांना त्रास होणार नाही, याची काळजी घेतली गेली आहे.

नियम काय सांगतात?

'ईपीएफओ'च्या नियमानुसार, कोणाचाही दावा हा कोणत्या ना कोणत्या कारणांनी नाकारता येणार नाही. त्याचबरोबर कोणत्याही दाव्याला अकारण प्रलंबित ठेवूनये. एखादा दावा पुन्हा नाकारला जात असेल, तर तो रद्द करण्यामागचे कारण स्पष्ट करायला हवे.

ईपीएफओच्या निर्देशानुसार, कोणत्याही खातेधारकांकडून दावा करताना काही उणिवा राहत असतील, तर अधिकार्‍यांनी वेळीच सांगणे गरजेचे आहे. त्यामुळे दावा दाखल होण्यास विलंब लागणार नाही. याउपरही दावा नाकारला जात असेल, तर सर्व दाव्यांची पडताळणी करत त्यात दुरुस्ती करा. यानुसार दावाकर्त्यास वेळेत पैसे मिळण्याची प्रक्रिया पार पाडली जाईल.

दिशानिर्देशानुसार, दाव्यात काही त्रुटी असतील, तर त्या एकदाच सांगायला हव्यात. पीएफ खातेधारांना वारंवार कार्यालयात चकरा मारण्याची आवश्यकता भासणार नाही. पीएफ खात्याच्या मते, प्रत्येक दाव्याची तपासणी एकदाच आणि पूर्ण करायला हवी.

अनेकदा संयुक्तिक कारण न सांगता अधिकारी दावा नाकारत असल्याच्या तक्रारी 'ईपीएफओ'कडे आल्या आहेत. त्यामुळे सदस्य अडचणीत येतात. या गोष्टी टाळायला हव्यात.

नव्या निर्देशानुसार, फिल्ड कार्यालयाने रद्द केलेला दावा पुनरावलोकन करण्यासाठी विभागीय कार्यालयाकडे पाठवायला हवा. त्याचबरोबर दाव्याची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी कार्यवाही करायला हवी.

ऑनलाईन पैसे काढण्याची सुविधा

'ईपीएफओ'च्या अधिकृत संकेस्थळावर जावे लागेल. त्यानंतर मेन्यूमध्ये सर्व्हिसेसच्या पर्यायावर क्लिक करा. आता फॉर एम्प्लाईवर क्लिक करा. एक नवीन पेज सुरू होईल. या ठिकाणी मेंबर यूएन /ऑनलाईन सर्व्हिसचा पर्याय निवडावा लागेल.

यानंतर लॉगईन पेज सुरू होईल. या ठिकाणी यूएएन अणि पासवर्ड टाका आणि पोर्टलवर लॉगईन करा. त्यानंतर ऑनलाईन सर्व्हिसवर क्लिक करा. ड्रॉप डाऊन मेन्यूने क्लेमची (फॉर्म-31, 19 आणि 10 सी) निवड करा.

क्लेम निवड केल्यानंतर नवीन पेज सुरू होईल आणि आपल्याला आपले बँक खाते व्हेरिफाय करावे लागेल. अकाऊंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर सर्टिफिकेट ऑफ अंडरटेकिंग सुरू होईल. ते आपल्याला अ‍ॅक्सेप्ट करावे लागेल. पुढच्या टप्प्यात आपल्याला 'प्रोसिड फॉर  ऑनलाईन क्लेम'च्या पर्यायाला क्लिक करावे लागेल.

आता नवीन फॉर्म समोर येईल आणि या ठिकाणी 'आय वाँट टू अप्लाय फॉर' समोर ड्रॉपडाऊन केल्याने पीएफ अ‍ॅडव्हान्सची (फॉर्म-31) निवड करावी लागेल. त्यानंतर पैसे काढण्याचे कारण नमूद करावे लागेल. किती पैसे हवे आहेत, तेदेखील सांगावे लागेल. यानंतर चेक बॉक्सवर टिक करताच प्रक्रिया पूर्ण होईल आणि आपला अर्ज सबमिट होईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news