Haryana Accident : वाढदिवसाची पार्टी करून परतणाऱ्या ६ मित्रांवर काळाचा घाला, डंपरने कारला धडक देऊन १०० मीटर नेले फरफटत

Haryana Accident
Haryana Accident
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : Haryana Accident : वाढदिवासाची पार्टी करून कारने परत येणा-या सहा मित्रांवर काळाने घाला घातला. एका डंपरने त्यांच्या कारला जोरदार धडक देऊन 100 मीटर फरफटत नेले. घटनेत सर्व सहा मित्रांचा मृत्यू झाला. ही घटना हरियाणाच्या पलवल येथे घडली. हे सहा ही मित्र वाढदिवसाची पार्टी करून गुरुग्राम येथे येत होते. ही घटना गुरुवारी रात्री घडली.

Haryana Accident : मृतांची ओळख पटली असून विशाल सेठी (18), पुनीत (27), बलजीत (27), जतिन (26), संदीप (28), आकाश उर्फ नोनी (29) अशी त्यांची नावे आहेत. हे सर्व पलवल येथी कॅम्प परिसरातील राहणारे होते.

मिळालेल्या माहितीनुसार Haryana Accident, ही दुर्दैवी घटना गुरुग्राम-फरीदाबाद रोडवर गुरुवारी रात्री घडली. सर्व 6 मित्र हे पलवलच्या कँम्प भागातील राहणारे होते. सर्वजण रात्री साधारण दीडच्या दरम्यान गुरुग्राम येथून वाढदिवसाची पार्टी करून परत येत होते. यावेळी या युवकांच्या कारला क्रशनर ने भरलेल्या डंपर ने जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतरही डंपर चालकाने डंपर न थांबवता कारला आणखी पुढे 100 मीटर फरफटत नेले. त्यामुळे कारसहित सगळे युवक डंपरच्या पुढील दोन पायाच्या मध्यभागी अडकले. 100 मीटर फरफटत नेल्यानंतर एकेठिकाणी कारचे छत उडाले आणि सर्व युवकांचा जागेवरच मृत्यू झाला.

Haryana Accident : दरम्यान, पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. धौज ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक सतीश डागर यांनी सांगितले जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले होते तेव्हा कारचा पूर्णपणे चुराडा झाला होता. आम्ही गॅस आणि कटरच्या सहाय्याने कारचे तुकडे करून सर्व मृतदेह बाहेर काढले. त्यांना उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला असून आरोपी डंपर चालक सध्या फरार झाला आहे. त्याने आपला डंपर घटनेपासून पुढे 2 किलोमीटर वर सोडून दिला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Haryana Accident : मृतांच्या नातेवाइकांनी सांगितले की सर्व मित्र वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी बाहेर पडले होते. त्यांचा एक मित्र पलवल येथे त्यांच्या घराजवळच राहतो. गुरुवारी त्याचा जन्मदिवस होता. त्याच्या मित्रांची गुरुग्राम येथे पार्टी करण्याची इच्छा होती. मात्र, रिंकू याने जाण्यासाठी नकार दिला. त्यामुळे सर्व मित्रांनी पलवल येथेच पार्टी केली आणि सर्वजण गुरुग्रामसाठी निघाले. मात्र, काळाने या सर्व 6 मित्रांवर घाला घातला.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news