हार्ली-डेविडसन च्या 7 बाईक्सची दिमाखात एन्ट्री

Harley devison bikes
Harley devison bikes

पुणे:पुढारी वृत्तसेवा

जगप्रसिध्द बाइक निर्माता कंपनी हार्ले-डेव्हिडसन लवकरच आपल्या नवीन बाईक्स लाँच करणार आहे. हार्ले-डेव्हिडसनने 2022 मध्ये 7 मोटारसायकल लॉन्च करणार असल्याची घोषणा केली आहे, त्यामध्ये ट्रायकचा देखील समावेश आहे.या नवीन मॉडेल्समध्ये दोन नवीन बॅगर्स, दोन नवीन लो रायडर्स आणि ब्रँडच्या कस्टम व्हेईकल ऑपरेशन्स सिवीओ श्रेणीतील चार नवीन मॉडेल्सचा समावेश आहे. 2022 च्या नवीन मॉडेल्समध्ये एक स्ट्रीट ग्लाइड एसटी, रोड ग्लाइड एसटी, लो रायडर एस, लो रायडर एसटी आणि तीन सिवीओ बाइक्स आणि एक सिवीओ ट्राइक यांचा समावेश आहे.या सर्व बाईक्स कंपनीच्या जुन्या बाईक्स चे नवीन व्हर्जन आहेत.

2022 च्या लाइन-अपमध्ये स्ट्रीट ग्लाइड एसटी तसेच हार्ले-डेव्हिडसन रोड ग्लाइड एसटीचा समावेश करण्यात आला आहे. हार्ले-डेव्हिडसन चे अध्यक्ष आणि सीईओ जोखेन जाईट्स म्हणाले, ग्रॅंड अमेरिकन टूरिंग आणि क्रूझर सेगमेंटवर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत. हे मॉडेल शक्ती प्रदर्शन करण्यासाठी डिझाइन केला आहे. ते पुढे असे म्हणाले की प्रत्येक नवीन मॉडेल मध्ये रायडर्ससाठी मिलवॉकी एट 117 इंजिनची अतुलनीय शक्ती आहे. ज्यामुळे जगातील सगळ्यात दमदार मोटारसायकल मध्ये आपली ओळख बनू शकते.

2022 चे हार्ले-डेव्हिडसन लो रायडर एस डिझाईन पूर्वीच्या हार्लेची आठवण करून देणारे आहे. इंजिन नवीन आहे. हे एक शक्तिशाली आणि मोठे इंजिन आहे. दोन्ही लो रायडर मॉडेल्सना सस्पेन्शनसाठी 43 मिमी अपसाइड डाउन फॉर्क्स आणि सस्पेन्शनसाठी मोठा रिअर मोनोशॉक आणि रीअर व्हील ट्रॅव्हल देण्यात आला आहे. निओ-रेट्रो डिझाईनमध्ये फेअरिंग आणि हार्ड-केस पॅनियर असल्यामुळे लो रायडर एसटी नवीन मॉडेलसारखी दिसते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news