हार्दिक पांड्याचा ‘तो’ निर्णय आशिष नेहराने बदलला, अन् सामन्याचा नूरच पालटला!

हार्दिक पांड्याचा ‘तो’ निर्णय आशिष नेहराने बदलला, अन् सामन्याचा नूरच पालटला!
Published on: 
Updated on: 

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामात या स्पर्धेतील नवीन संघ गुजरात टायटन्सने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणा-या या संघाने 8 पैकी 7 सामने जिंकून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गुजरात संघाने आतापर्यंत 14 गुणांची कमाई करत प्लेऑफचा दावा मजबूत केलाय. गुरुवारी (दि. 27) अत्यंत रोमांचक सामन्यात संघाने हैदराबादविरुद्ध अखेरच्या षटकात चार षटकारांच्या जोरावर विजय मिळवला. 196 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातने हैदराबादवर शेवटच्या चेंडूवर षटकार खेचून विजयाची नोंद केली.

या विजयानंतर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आयपीएलच्या अधिकृत साईटवर राशिद खान आणि राहुल तेवतिया यांच्याशी बोलताना, कर्णधार हार्दिक पंड्याने मोठा खुलासा केला. शेवटच्या षटकात त्याच्यात आणि मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरामध्ये काय संवाद घडला याची त्याने माहिती दिली. हार्दिक म्हणाला, 'आता मी दोन्ही बाजूचे सामने बघायला सुरुवात केली आहे, ना मी खूप आनंदी असतो ना खूप दु:खी. कारण मी ज्या पद्धतीने वागतो त्याचा सगळ्यांना भीती वाटेल. पण या सगळ्या सामन्यांदरम्यान आशु पा आणि मी (आशिष नेहरा) विचार करत होतो की हैदराबाद विरुद्धचा सामना खूप कठीण होत आहे. 'मी सुपर ओव्हरसाठीची मानसिक तयारी केली होती. पण आशु भाई मला म्हणाले, थांबा गडबड करू नकोस. आपण नक्कीच सामना विजय मिळवून संपवणार आहोत. तु (राहुल तेवतिया) थाई पॅड परत पाठवले आणि मला वाटले की हे लोक सुपर ओव्हरसाठी जाणार आहेत.'

तेवतियाने हार्दिकला थाई पॅड परत पाठवण्यावरून सांगितले की, 'मी विचार केला की, गोलंदाजाने यॉर्कर टाकालाच तर राशिद भाई तो फटाका मारेल जो सहसा पायांच्यामधून स्क्वेअर बाउंड्रीच्या दिशेने फटकावला जातो. मी असाही विचार केला होता की, जर हा चेंडू सीमापार षटकार झाला नाही तर मला धाव घ्याचीच लागेल. पण राशिद भाईने तो कारनामा केला आणि षटकार ठोकून रोमहर्षक पद्धतीने सामना जिंकला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news