Hardik and Natasa : हार्दिक पंड्याचे असेही व्हॅलेंटाईन, पुन्हा एकदा…

Hardik Pandya and Natasa
Hardik Pandya and Natasa

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्यासाठी यावेळेसचा व्हॅलेंटाईन खास असणार आहे. हार्दिक पंड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टेन पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकणार आहेत. हार्दिक आणि नताशाने कोर्ट मॅरेज केले होते. विवाहापूर्वीच नताशाने अगस्त्यला जन्म दिला होता. दोघांनाही लगीनघाई झाल्याने त्यांनी कोर्ट मॅरेज केले होते. (Hardik Pandya and Natasa) आता हार्दिक आणि नताशा यांचा भव्य विवाह सोहळा पार पडणार आहे. ते दोघेही १४ फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेंटाईन दिवशी पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकणार आहेत.

उदयपुरमध्ये पार पडणार भव्य विवाह सोहळा (Hardik Pandya and Natasa)

हार्दिक आणि नताशाचा विवाह राजस्थानच्या उदयपुरमध्ये पार पडणार आहे. उदयपुरमधील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये त्यांचा विवाह पार पडेल. या विवाह सोहळ्यात दोघांच्या कुटुंबाबरोबरच जवळचे मित्रही उपस्थित असतील. हा विवाह सोहळा १३ ते १६ फेब्रुवारी दरम्यान पार पडणार आहे. यामध्ये हळदी, मेहंदी आणि विवाह असे सर्व विधी पार पडतील. दोघांचा विवाह अतिशय भव्य असणार आहे. हा विवाह पारंपरिक पद्धतीने पार पडेल. यापूर्वी त्यांचे कोर्ट मॅरेज झाले आहे. (Hardik Pandya and Natasa) मात्र, यावेळी ते पारंपरिक पद्धतीने विवाह बंधनात अडकतील.

हार्दिकने २०२० मध्ये नताशाला केले होते प्रपोज (Hardik Pandya and Natasa)

हार्दिक पंड्याने २०२० मध्ये नताशाला प्रपोज केले होते. यावेळी हार्दिकने नताशाला डायमंडची अंगठी घातली होती. त्यानंतर ३१ मे २०२० मध्ये त्यांनी विवाह केला होता. त्यानंतर जुलै २०२० मध्ये नताशा आणि हार्दिकला मुलगा झाला होता. (Hardik Pandya and Natasa) दरम्यानच्या काळात भारतीय संघाकडून हार्दिक पंड्याच्या खांद्यावर मोठ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. बीसीसीआयने हार्दिकवर सातत्याने टी २० संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. काही दिवसांपूर्वी पार हार्दिकच्या नेतृत्वात भारतीय संघाने न्यूझीलंडविरोधात विजय मिळवला.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news