पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेत्री वाणी कपूरचा (HBD Vaani Kapoor ) आज २३ ऑगस्ट रोजी ३४ वा वाढदिवस आहे. अभिनेत्री वाणी ग्लॅमरस फोटोज शेअर करून नेहमी सोशल मीडियावर फॅन्समध्ये चर्चेत राहते. ती (HBD Vaani Kapoor) निवडक बॉलीवूड चित्रपटांमध्ये दिसली असली तरी आज वाणी कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे. पाहुया तिच्या जन्मदिनी या खास गोष्टी… अभिनेत्री वाणी कपूरने २०१३ मध्ये चित्रपट 'शुद्ध देसी रोमान्स'(Shuddh Desi Romance) मधून सिनेविश्वात एन्ट्री केली होती. यशराज फिल्म्स बॅनर अंतर्गत सुशांत सिंह राजपूत आणि परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटामध्ये वाणीने आपल्या अभिनयाने लोकांना अक्षरश: वेड लावलं होतं.
वाणी कपूर का जन्म २३ ऑगस्ट, १९९२ रोजी दिल्लीत झाला. तिने पर्यटन विषयात पदवी घेतलीय. जयपूरमध्ये द ओबेरॉय हॉटेल्ससोबत तीन वर्षे इंटर्नशिप आणि आयटीसी हॉटेलमध्ये काम केल्यानंतर तिने मॉडलिंग विश्वात पाऊल ठेवलं.
वाणीच्या वडिलांचे नाव शिव कपूर आहे. ते एक बिझनेसमन आहेत. तिच्या आईचे नाव डिम्पी कपूर आहे. ती एक मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आहे. वाणीच्या फॅमिलीमध्ये कुणीही चित्रपटाशी संबंधित नाही.
मॉडलिंगमधून अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवणारी वाणी सुंदरच नव्हे तर खूप टॅलेंटेडदेखील आहे. तिने आपल्या करिअरची उंची गाठताना बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. अभिनयासोबत तिने मॉडलिंगदेखील केले. ती मॉडलिंग, फोटोशूट, जाहिरतीतून तगडी कमाई करते. तिने आपल्या करिअरमध्ये अनेक प्रसिद्ध फॅशन डिझायनर्ससाठी रॅम्प वॉक केलं. तसेच टेलीव्हिजन जाहिरातींमध्येही अभिनय केला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, २०२२ मध्ये वाणीची संपत्ती अंदाजे १० कोटी इतकी होती. रिपोर्टनुसार, वाणी जवळपास ३७५ दशलक्ष संपत्तीची मालकीण आहे. दिल्ली आणि मुंबईत तिचे स्वतःचे घर आहे. या शिवाय अनेक महागड्या गाड्यांचेही कलेक्शन आहे. बातमीनुसार, वाणीने देशाबाहेरही जंगम मालमत्ता तयार केली आहे. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
वाणी कपूर नुकतीच 'शमशेरा' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात ती रणबीर कपूरसोबत दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नसला तरी लोकांना त्याचा अभिनय आणि व्यक्तिरेखा खूप आवडल्या. 'शमशेरा' २२ जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. 'शमशेरा'पूर्वी वाणी 'चंदीगढ करे आशिकी', 'बेलबॉटम', 'बेफिक्रे' आणि 'वॉर' चित्रपटात दिसली होती.