पुढारी ऑनलाईन डेस्क : एव्हरग्रीन रेखाचा आज ६९ वा वाढदिवस आहे. तिचा जन्म १० ऑक्टोबर, १९५४ मध्ये चेन्नईमध्ये झाला होता. (Rekha Birthday) रेखा नेहमीच आफल्या खासगी जीवनावरून चर्चेत राहिली आहे. सत्तरी गाठायला आलेल्या रेखाच्या सौंदर्याची जादू आजही कमी झालेली नाही. आजदेखील टॉपच्या सुंदर अभिनेत्रींमध्ये रेखाचं नाव घेतलच जातं. वयाच्या ६९ व्या वर्षातदेखील रेखा सिंगल राहिली आहे, पण तरीही ती सिंदूर लावते. (Rekha Birthday)
संबंधित बातम्या –
करिअर प्रमाणे तिच्या वैयक्तिक आयुष्यानेदेखील अनेक वळणे घेतली. आयुष्यात चढ-उतार तर आलेच पण ती आपल्या सौंदर्याने आणि मनमोहक अदांनी मायावी दुनियेवर निर्विवादपणे हुकुमत गाजवत राहिली. तिच्या सौंदर्याची अनेकांना भूरळ आहे. सुरुवातीला सावळ्या वर्णाची रेखा नंतरच्या काळात इतकी बदलली की, कालानुरुप तिचे वय इतकं आहे, हे सहजासहजी लक्षात येत नाही.
तिच्या उंची साड्या आणि सिंदूर लावणं, तिच्या शृंगाराचा एक भाग असला तरी, ती अद्यापही सिंदूर का लावते, असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. केसांचा अंबाडा, त्यामध्ये गजरा माळणे आणि केसाच्या भांगेत ठसठशीत सिंदूर भरणे, अगदी सुरुवातीपासूनच गडद लिपस्टिक लावणे तिचे हे देखणे रुप मोहावणारे आहे. तिच्या बोलक्या डोळ्यातील गडद काजळ आणि उंची साड्या नेसणं, या सर्व गोष्टी पाहून 'रेखा तो बस रेखा ही हैं' असे नक्की म्हणावसं वाटतं.
रेखाच्या आयुष्याबद्दल जाणून घ्यायला चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. रेखाची एकाहून लग्ने झाल्याचे म्हटले जाते. तिचे पतीचे निधन झाले आहे, तरीही ती सिंदूर का लावते, यावर अनेकदा चर्चादेखील झाल्या. आयुष्यातील असंख्य घडामोडींविषयी तिने तिची बायोग्राफी 'रेखा-ॲन अनटोल्ड स्टोरी'मध्ये सांगितल्या, अनेक गोष्टींचा उलगडा यातून झालेला आहे.
वयाच्या सत्तरीत रेखाचे सौंदर्य इतकं कसं टिकून आहे? ती फिट राहण्यासाठी काय करते. अनेक अभिनेत्रींना लाजवेल, असा तिचा फिटनेस आहे. या वयातही ती स्टाईल काय असते, हे तिच्याकडून शिकावं. क्लींजर, टोनिंग, माईस्चॉरायझिंग आणि मेकअप रिमूव्ह करण्याबराबरच रेखा ठेवण्यासाठी अरोमा थेरेपी आणि स्पा ट्रीटमेंटदेखील घेते. त्यामुळेच तिचा चेहरा इतका ग्लो करतो.
आहाराबाबतही रेखा खूप काळजी घेते. ती संध्याकाळी साडेसात वाजताच जेवते. त्यानंतर ती ज्यूस पिते. दिवसभरात भरपूर पाणी पिते. रेखाने एका मुलाखतीत म्हटले होते की, ती फक्त शाकाहारी जेवणच घेते. ताज्या भाज्या आणि दही, सॅलडचा नियमितपणे खाते.
रेखाचे काळेभोर केस तिच्या सौंदर्याला चारचाँद लावतात. ती केसांसाठी दही, मध आणि अंड्यातील पांढरा भागाचा बनवलेला पॅक लावते. ती हेअर ड्रायरचा वापर कधीच करत नाही. आयुर्वेदाचा वापर ती नेहमी करते.