पुढारी ऑनलाईन डेस्क : दिशा पटानी बॉलीवूडची बोल्ड आणि ग्लॅमरस अदाकारा आहे. १३ जून रोजी तिचा वाढदिवस आहे. तिचा जन्म उत्तर प्रदेशातील बरेली येथे झाला. दिशा पटानीचे वडील जगदीश सिंह पटानी एक पोलिस अधिकारी आहेत. (HB'day Disha Patani) तर आई हेल्थ इन्स्पेक्टर आहे. तिची बहिण खुशबू पटानी भारतीय लष्करात आहे. तिला एक लहान भाऊ आहे, जो शिक्षण घेत आहे. (HB'day Disha Patani)
दिशाची रुची ग्लॅमर जगतात होती. ती फेमिना मिस इंडिया इंदौर २०१३ ची फर्स्ट रनरअप होती. अभिनयात दिशाने साऊथच्या चित्रपटातून डेब्यू केला होता. तिचा पहिला चित्रपट तेलुगू 'लोफर' (२०१५) होता. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप झाला. य़ाचवर्षी तिने टायगर श्रॉफसोबत एक म्युझिक व्हिडिओ 'बेफिक्रा' केला.
दिशा पटानीला मोठा ब्रेक नीरज पांडेचा चित्रपट 'एमएस धोनी: द अनडोल्ड स्टोरी'मधून मिळाला. चित्रपटात सुशांत सिंह राजपूतने मुख्य भूमिका केली होती. तिची सुशांतच्या गर्लफ्रेंडची भूमिका होती.
दिशाने करिअरमध्ये मुख्य चित्रपटामध्ये 'बागी २', 'भारत', 'मलंग' आणि 'राधे'सहित अन्य चित्रपट केले आहेत. आगामी चित्रपटात धर्मा प्रोडक्शन्सचा 'योद्धा' चित्रपट आहे. याशिवाय अमिताभ बच्चन, प्रभास, दीपिका पादुकोणसोबत 'प्रोजेक्ट के' करत आहे. या चित्रपटामध्ये साऊथ स्टार सूर्यासोबत ती दिसणार आहे.
बीटेकचे शिक्षण घेत असताना ती ऑडिशन देऊ लागली. शिक्षणात ती खूप हुशार होती. सोबत ती मॉडलिंग करू लागली. लहान वयात ती पैसे कमवू लागली. मधून तिने बीटेकचे शिक्षण सोडले आणि पूर्णपणे आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित केलें. यावेळी तिला 'लोफर' हा चित्रपट मिळाला होता. एका मुलाखतीत दिशा म्हणाली होती की, ती शिक्षणात हुशार होती. पण बीटेकचे विषय सोपे नव्हते. कॉलेज ड्रॉपआऊट करून ती खुश होती.
मोकळा वेळ असेल तेव्हा दिशा फिरायला जाते. तिला ट्रॅव्हलिंगची आवड आहे. मागच्या वर्षी ती युरोप ट्रिपवर एकटी गेली होती.