Happy Birthday Asha Bhosle : नव्वदीतही आशा भोसलेंचा सूरमयी आवाज अन्‌ जबरदस्त फिटनेस

आशा भोसले
आशा भोसले
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज ८ सप्टेंबर रोजी सूरमयी गायिका आशा भोसले यांचा वाढदिवस होय. वयाच्या नव्वदीतही आशा भोसलेंना पाहत राहावं, असा त्यांचा जबरदस्त फिटनेस आहे. या वयातही त्यांचा सुरेल आवाज ऐकायला चाहते उत्सुक असतात. (Happy Birthday Asha Bhosle) नव्वदीतही उभारून गाणे गाणाऱ्या आशा भोसले यांच्या फिटनेसचे रहस्य काय आहे माहिती आहे का? आशा भोसले या वयात फक्त गाणेचं गात नाही तर प्रवाही करतात आणि स्वयंपाकही बनवतात. (Happy Birthday Asha Bhosle)

या वयातही त्या खूप ॲक्टिव्ह आहेत. अनेक लोकांसाठी त्या प्रेरणा बनल्या आहेत. आशा यांना पाहून त्यांच्या वयाचा अंदाज लावणे कठीण आहे. त्या पणजी आदी झाल्या आहेत. पण, आजही स्वयंपाक करतात आणि अनेक तास उभे राहून गाणी गातात. आपल्या जन्मदिनी त्यांनी आपल्या फिटनेसचे रहस्य उघड केले आहे.

८० वर्षांचे करिअर

लेजंड्री सिंगर आशा भोसले जेव्हा ९ वर्षांच्या होत्या, तेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे कुटुंबीय पुण्याहून कोल्हापूर आणि पुन्हा मुंबईत गेले. आशा आणि लता या दोन्ही बहिणींनी काम करणे सुरू केले. त्यामुळे आशा भोसले यांचे गाण्यातील करिअर ८० वर्षांचे झाले आहे.

ॲक्टीव्ह राहण्यामागचे रहस्य

आशा भोसले सांगतात की, जो व्यक्ती आपले वय आपल्या डोक्यात ठेवतो, तोच लवकर वृद्ध होतो. मला अद्यापही वाटते की, मी ४० पेक्षा जास्त नाही. जेव्हा मी नातवंडांना पाहते, तेव्हा मला जाणीव होते की, इतका कालखंड गेला आहे. मी काम करते, फिरते आणि घरी जेवणही बनवते. जेव्हा मी परफॉर्म करते तेव्हा मला लोकांशी आणि श्रोत्यांशी बातचीत करणे चांगले वाटते. मला वाटतं की, त्यांचे संपूर्ण मनोरंजन व्हायला पाहिजे. जर काळाने संधी दिली तर जादू करत राहीन आणि विनोदही करेन.

 

View this post on Instagram

 

A post shared by Asha Bhosle (@asha.bhosle)

आशा भोसले यांच्या बहिण गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याविषयी आशा म्हणाल्या होत्या की, त्यांचे लता यांच्यासोबत हेल्दी कॉम्पिटीशन होतं. एका म्युझिक डायेरक्टरला एकदा लता यांनी गायलेले गाणे आशा यांचे वाटले होते. तेव्हा आशा भोसले यांना वाटले होते की, काहीतरी वेगळं करावं लागेल, नाही तर माझी वेगळी ओळख होणार नाही. यानंतर आशा यांनी आपल्या गाण्यांमध्ये इंग्लिश चित्रपट आणि म्युझिशियन्सचे काही एलिमेंट्स वापरणे सुरु केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news