Gyanvapi mosque ASI survey | ‘ज्ञानवापी’चे आज सलग पाचव्या दिवशी सर्वेक्षण; गेल्या ४ दिवसांत काय सापडले?

Gyanvapi mosque ASI survey | ‘ज्ञानवापी’चे आज सलग पाचव्या दिवशी सर्वेक्षण; गेल्या ४ दिवसांत काय सापडले?
Published on: 
Updated on: 

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या चार दिवसांपासून वाराणसीमधील ज्ञानवापी मशिद परिसराचे सर्वेक्षण सुरू आहे. आज (दि.८ ऑगस्ट) सलग पाचव्या दिवशी ASI (भारतीय पुरातत्व सर्वेक्षण) ची टीम वाराणसीतील ज्ञानवापी मशिद संकुलात पोहोचली. आज परिसरातील मैदानाच्या वरच्या पृष्ठभागाची तपासणी पूर्ण झाली आहे. दरम्यान, पुरातत्व टीमने प्रत्येक सुक्ष्म तपशीस नोंदवला आहे. परिसरातील बांधकामाचा दर्जा, कलाकृती आदींची तपासणी केली जात आहे, असे वृत्त एएनआयने दिले आहे. (Gyanvapi mosque ASI survey)

एएसआयच्या पथकाने ज्ञानवापीच्या घुमटांची सुरुवातीची रचना आणि बांधकामाची माहिती घेतली आहे. घुमटांचे थ्रीडी मॅपिंग करण्यात आले. कांगूर (घुमटाचा वरचा भाग) प्राचिनतेचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करण्यात आला. भिंत आणि घुमट यांच्यातील बांधकामात साम्य नाही. त्याचे थ्रीडी मॅपिंग, फोटो आणि व्हिडिओग्राफी करण्यात आली. तपासणीसाठी डायल टेस्ट इंडिकेटर बसवले आहे. याद्वारे बांधकाम आणि पृष्ठभागाची एकसमानता जुळली जात आहे, असेही म्हटले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेंट व्हर्नियर बेव्हल प्रोट्रॅक्टर मशीनचा वापर कलाकृती, धार्मिक चिन्हे आणि तीन घुमटांच्या आत आणि भिंतींच्या आतील रचना तपासण्यासाठी करण्यात आला. यावरून मिळालेला डेटा टोपोग्राफी शीटवर उतरवण्यात असून, टोपोग्राफी शीटनुसार, ASI टीम हे नमुने पुढे अभ्यासाला घेतले जाणार, असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

'तहखाना' आज उघडला जाऊ शकतो- रेखा पाठक

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) टीम आज ज्ञानवापी मशीद संकुलाचे वैज्ञानिक सर्वेक्षण सुरू ठेवणार आहेत, असे हिंदू पक्षाच्या याचिकाकर्त्या रेखा पाठक यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, तहखाना' आज उघडला जाऊ शकतो. आम्ही सर्वेक्षणाबद्दल खूप उत्सुक आहोत. सकाळी उठून ड्युटीला जाणे हा आमचा नित्यक्रम बनला आहे, असेही त्या म्हणाल्या. आमचे काम हे पर्यवेक्षण करणे. सर्वेक्षण सकाळी ८ वाजता सुरू होते आणि संध्याकाळी ५ वाजेपर्यंत चालेल, असेही त्या म्हणाल्या.

ढिगारा हटविल्याशिवाय फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अशक्य-सुधीर त्रिपाठी

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) आज ज्ञानवापी मशीद संकुलाचे वैज्ञानिक सर्वेक्षण सुरू ठेवणारच आहे, अशी माहिती हिंदू बाजूचे वकील सुधीर त्रिपाठी यांनी सर्वेक्षणावर बोलताना दिली. आज सकाळी ८ वाजता हे सर्वेक्षण सुरू झाले आहे. येथील घुमटाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, 'तहखाना'चेही सर्वेक्षण केले जात आहे. ढिगारा हटविल्याशिवाय फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी शक्य नाही, असेही सुधीर त्रिपाठी यांनी स्पष्ट केले आहे. (Gyanvapi mosque ASI survey)

उद्यापासून जीपीआर सर्वेक्षण सुरू होऊ शकते

सर्वेक्षणाच्या सातव्या दिवशी म्हणजे बुधवारपासून याठिकाणी जीपीआर (ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार) तंत्रज्ञानाने सर्वेक्षण सुरू होऊ शकते. आयआयटी कानपूरच्या तज्ज्ञांची टीम बुधवारी रात्रीपर्यंत वाराणसीला पोहोचू शकते. एएसआयने ज्ञानवापी सर्वेक्षणात आयआयटी कानपूरची मदत घेतली आहे. आयआयटीमध्ये आधुनिक रडार आहे. रडार सर्वेक्षणात ज्ञानवापी परिसराचा नव्याने अभ्यास केला जाईल. जीपीआरच्या मदतीने जमिनीखालील सत्य न खोदता कळू शकते, असेही सांगण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news